घरदेश-विदेशसोनिया गांधी या 'विषकन्या', पाकिस्तान आणि चीनच्या एजंट; भाजपच्या आमदाराचं वादग्रस्त वक्तव्य

सोनिया गांधी या ‘विषकन्या’, पाकिस्तान आणि चीनच्या एजंट; भाजपच्या आमदाराचं वादग्रस्त वक्तव्य

Subscribe

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले. त्यांनी पीएम मोदींची तुलना 'विषारी सापा'शी केली. आता यानंतर राज्यातील भाजप आमदाराने यूपीए अध्यक्षा सोनिया गांधी यांना 'विषकन्या' म्हटले आहे.

कर्नाटकात विधानसभेच्या निवडणुका असून सध्या राजकारण तापले आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन यांची जीभ अशाप्रकारे घसरली की त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले. त्यांनी पीएम मोदींची तुलना ‘विषारी सापा’शी केली. आता यानंतर राज्यातील भाजप आमदाराने यूपीए अध्यक्षा सोनिया गांधी यांना ‘विषकन्या’ म्हटले आहे.  ( Karnataka BJP MLA Basnagowda Yatnal on UPA President Sonia Gandhi called vishakanya )

कलबुर्गी येथील जाहीर सभेत मल्लिकार्जुन खर्गे यांनी केलेल्या वक्तव्यानंतर भाजपच्या गोटातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. कर्नाटकातील भाजप आमदार बसनागौडा यत्नल यांनी यूपीए अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य करताना त्यांच्यासाठी विषकन्या हा शब्द वापरला आहे.

- Advertisement -

सोनियाबाबत वक्तव्य, बघेल यांनी विचारला प्रश्न

कर्नाटकच्या भाजप आमदाराच्या अशा वक्तव्यानंतर आता काँग्रेसने हल्ला चढवला आहे. या विधानाबाबत छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांनी विचारले की बसनगौडा यत्नल यांच्या वक्तव्यावर पंतप्रधान मोदी आणि अमित शहा काय बोलू बोलणार आहेत?

- Advertisement -

जाहीर सभेत खर्गे यांची जीभ घसरली

विशेष म्हणजे कर्नाटक विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यातील सर्वच पक्ष निवडणूक प्रचारात व्यस्त आहेत. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनीही कुलबुर्गी येथे झालेल्या जाहीर सभेत हे आक्षेपार्ह विधान केले आहे. या विधानापूर्वी त्यांनी पंतप्रधानांचे चांगले व्यक्तिमत्व असे वर्णन केले होते आणि त्यानंतर त्यांची भाषा अशोभनीय होऊ लागली. ते म्हणाले, पीएम मोदी हे विषारी सापासारखे आहेत. ते विष आहे की नाही असा प्रश्न तुम्हाला पडेल. जर तुम्ही त्यांच्याशी संपर्कात आलात तर तुम्ही मराल, असे वक्तव्य खर्गे यांनी केले होते.

( हेही वाचा: सत्यपाल मलिकांची सीबीआयकडून सात महिन्यात दुसऱ्यांदा चौकशी )

भाजप आमदाराचे संपूर्ण वक्तव्य

कोप्पल येथील जाहीर सभेत यत्नल म्हणाले की, संपूर्ण जगाने पंतप्रधान मोदींना स्वीकारले आहे. अमेरिकेने एकेकाळी त्यांना व्हिसा देण्यास नकार दिला होता. आता अमेरिकेने रेड कार्पेट पसरवून पंतप्रधान मोदींचं स्वागत केलं आहे. खर्गे यांच्या ‘विषारी साप’ या विधानावर पलटवार करत आमदार म्हणाले की, आता ते (खर्गे) पीएम मोदींची तुलना सापाशी करत आहेत आणि ते विष ओकणारे असल्याचे सांगत आहेत. खर्गे ज्या पक्षात आहेत त्या पक्षात असणाऱ्या सोनिया गांधी विषकन्या आहेत का? सोनियांनी चीन आणि पाकिस्तानबरोबर त्यांचे एजंट म्हणून काम केले, असेही ते म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -