घरक्राइमKarnataka High Court : सहा वर्षं संमतीने शरीर संबंध, नंतर महिलेचा बलात्काराचा...

Karnataka High Court : सहा वर्षं संमतीने शरीर संबंध, नंतर महिलेचा बलात्काराचा आरोप; हायकोर्टाने फटकारले

Subscribe

Karnataka High Court : सहा वर्षे नातेसंबंधात राहिल्यानंतर लग्नाच्या वचनाचा भंग केल्याचा आरोप महिलेने आपल्या पार्टनरवर केला आणि त्यांच्याविरोधात बलात्काराचे आरोप करत दोन फौजदारी खटले दाखल केले. परंतु उच्च न्यायालयाने या महिलेलाच फटकारले आहे. (Karnataka High Court Consensual sex for six years then woman accused of rape The High Court reprimanded)

बंगळुरुमध्ये राहणाऱ्या एका महिलेचे पुरुषासोबत सोशल मीडियावरून ओळख झाल्यानंतर एक दोन नव्हे तब्बल सहा वर्षे सहमतीने शरीर संबंध प्रस्थापित झाले होते. परंतु, 27 डिसेंबर 2019 पासून दोघांमधील जवळीक कमी झाल्यानंतर याबाबत महिलेने आरोप करायला सुरूवात केली. तिने पुरुषावर बलात्काराचा आरोप करत दोन फौजदारी खटलेही दाखल केले.

- Advertisement -

हेही वाचा – अरेच्चा, अमित शहांनी उल्लेख केलेल्या ‘कलावती’ महाराष्ट्रातील; राहुल गांधींनी घेतली होती 15 वर्षांआधी भेट

याप्रकरणी सुनावणी करताना कर्नाटक उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एम. नागप्रसन्ना यांनी म्हटले की, 6 वर्षे सहमतीने शारीरीक संबंध ठेवल्यानंतर जवळीक कमी होणे याचा अर्थ तो बलात्कार होऊ शकत नाही. पहिल्या दिवसापासून संमतीने केलेले कृत्य होते, असे न्यायमूर्तींनी म्हटले.

- Advertisement -

या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयाने दिलेले अनेक निकाल- प्रमोद सूर्यभान पवार विरुद्ध महाराष्ट्र राज्य आणि इतर काही प्रकरणांमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा दाखला देत न्यायमूर्ती म्हणाले की, लैंगिक संबंध सहा वर्षे राहिले. आयपीसीच्या कलम 376 अन्वये तो बलात्कार म्हणता येणार नाही.

हेही वाचा – Manipur Violence : गृहमंत्र्यांनी संसदेत सांगितलं हिसाचाराचं खरं कारण; म्हणाले…

दरम्यान, महिलेने बेंगळुरू शहरातील इंदिरानगर पोलिसांत 2021 मध्ये पुरुषाविरोधात तक्रार दाखल केली होती. महिलेच्या तक्रारीनुसार दोघांमध्ये 2013 मध्ये फेसबुकच्या माध्यमातून मैत्री झाली. शेजारी राहत असल्याने आणि चांगला शेफ असल्याने ती त्याच्या घरी जायची. दोघांमध्ये खाणे-पिणे शारीरिक संबंध असायचे. सहा वर्षे लग्नाचे आश्वासन देऊन तिच्याशी शारीरिक संबंध ठेवल्यानंतर त्याने लग्नाचे वचन मोडले, असे महिलेने म्हटले आहे.

हेही वाचा – R Thyagarajan : आपल्या कर्मचाऱ्यांमध्ये केली 62 अब्ज संपत्ती वितरित; कोण आहेत हे भारतीय टायकून?

8 मार्च 2021 रोजी महिलेने इंदिरानगर पोलिसात फसवणूक आणि धमकावल्याचा आरोप करत तक्रार नोंदवली. दावणगेरे येथे जाऊन त्याच आरोपांच्या आधारे मारहाण आणि बलात्काराची दुसरी तक्रारही नोंदवली. दुसऱ्या तक्रारीत महिलेने पुरुषाविरोधात आणखी एका महिलेचेही नावही घेतले. पोलिसांनी दोन्ही गुन्ह्यांमध्ये आरोपपत्र दाखल केले होते.

पुरूषासह सहआरोपी महिलेने या कारवाईला याचिकेतून आव्हान दिले. फिर्यादी महिलेला श्रीमंत लोकांशी मैत्री करणे, पैसे उकळणे आणि गुन्हे नोंदवून ब्लॅकमेल करण्याची सवय असल्याचा आरोप करण्यात आला होता. याच महिलेचे आणखी एका पुरुषाशी शारीरिक संबंध होते आणि नंतर त्या पुरूषाविरोधातही तिने बलात्काराचा गुन्हा दाखल केला असल्याचे याचिकाकर्त्यांने म्हटले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -