घरताज्या घडामोडीLive Update: छत्तीसगढमध्ये २४ तासांत १५,१५७ नव्या रुग्णांची वाढ, २५३ जणांचा मृत्यू

Live Update: छत्तीसगढमध्ये २४ तासांत १५,१५७ नव्या रुग्णांची वाढ, २५३ जणांचा मृत्यू

Subscribe

गेल्या २४ तासांत छत्तीसगढमध्ये १५ हजार १५७ नव्या कोरोनाबाधितांची वाढ झाली असून ३१५ जण कोरोनामुक्त झाले आहेत आणि २५३ जणांचा मृत्यू झाला आहे.

- Advertisement -

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मुख्यमंत्र्यांनी केंद्राला आणि राष्ट्रपतींना जोडले हात


मराठा आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टाने दिलेला निर्णय निराश करणार – मुख्यमंत्री

- Advertisement -

तिसऱ्या लाटेला तोंड देण्यासाठी महाराष्ट्रात तयारी सुरू – उद्धव ठाकरे


लसपुरवठा वाढला की लसीकरणाचा वेग तात्काळ वाढवणार – मुख्यमंत्री


काही जिल्ह्यात अजूनही प्रादुर्भाव वाढतोय – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे


महाराष्ट्रातली रुग्णवाढ मंदावली – मुख्यमंत्री


गोव्यात गेल्या २४ तासांत ३ हजार ४९६ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ७१ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर २ हजार १९२ रुग्ण बरे झाले आहेत. गोव्यात सध्या २७ हजार ९६४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज रात्री ८.३० वाजता जनतेशी संवाद साधणार आहे. कोरोना, मराठा आरक्षण या मुद्द्यांवर मुख्यमंत्री जनतेशी संवाद साधण्याची शक्यता आहे.


केरळमध्ये आज दिवसभरात सर्वाधिक रुग्णांची वाढ जाली आहे. गेल्या २४ तासांत केरळमध्ये ४१ हजार ९५३ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ५८ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. सध्या ३ लाख ७५ हजार ६५८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

 


दिल्लीत गेल्या २४ तासांत २० हजार ९६० नव्या कोरोनाबाधितांची वाढ झाली असून ३११ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर १९ हजार २०९ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. दिल्लीत आता कोरोनाबाधितांची एकूण संख्या १२ लाख ५३ हजार ९०२वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत १८ हजार ६३ जणांचा मृत्यू झाला असून ११ लाख ४३ हजार ९८० जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या ९१ हजार ८५९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.


सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल निराशाजनक- अशोक चव्हाण

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर दिलेला आरक्षण रद्द करण्याचा निकाल निराशाजनक आहे. आरक्षणाबाबचतचा निर्णय पंतप्रधान आणि राष्ट्रपतींनीच घ्यावा. या निकालामुळे महाराष्ट्रावर अन्याय झाला आहे. या मराठा आरक्षणाची बाजू सरकारने पूर्ण ताकदीने मांडली असल्याचेही अशोक चव्हाण यांनी म्हटले


सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या या महत्त्वपूर्ण निर्णयाने मराठा समाजात तीव्र नाराजी पसरली आहे. या निर्णयामुळे आपण भावूक झालो आहोत, अशी प्रतिक्रिया खासदार संभाजीराजे यांनी दिली. यासह सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा मी आदर करतो. परंतु, आजचा दिवस मराठा समाजासाठी दुर्दैवी आहे, असे वक्तव्य खासदार संभाजीराजे यांनी केले.


सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे मराठा समाजावर अन्याय झाला आहे. संपूर्ण मराठा समाज श्रीमंत नाही. गरीब मराठा समाजाच्या विरोधात श्रीमंत मराठा समाज, असे म्हणत आरक्षण रद्द झाल्याच्या मुद्द्यावर प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली.


राज्य सरकारने बनवलेला मराठा आरक्षणाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाकडून सुनावण्यात आला आहे. (सविस्तर वाचा)


देशात गेल्या २४ तासात ३ लाख ३८ हजारांहून अधिकांनी केली कोरोनावर मात

देशात गेल्या २४ तासात ३ लाख ८२ हजार ३१५ नव्या कोरोना बाधित रूग्णांची नोंद कऱण्यात आली आहे. याकाळात ३ हजार ७८० जणांचा कोरोनाने मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. दिलासादायक म्हणजे कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावादरम्यान ३ लाख ३८ हजारांहून अधिकांनी केली कोरोनावर मात केली आहे.


दिल्लीत कोरोनाचा कहर कायम असून आज १९ हजारांहून अधिक नव्या कोरोना बाधित रूग्णांची नोंद करण्यात आली. यासोबतच ३३८ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.


पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत अभूतपूर्व यश मिळवल्यानंतर तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी या मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहे. त्या आज सकाळी १० वाजून ४५ मिनीटांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असून सलग तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदावर विराजमान होणार आहेत. ममता बॅनर्जींच्या शपथविधीला कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता ठराविक लोकांनाच आमंत्रित करण्यात आलं आहे.


बृहन्मुंबई महानगरपालिकेला काल रात्री १ लाख लसीच्या डोसचा नवीन साठा उपलब्ध


आज मराठा आरक्षणाबाबतचा निकाल सर्वोच्च न्यायालय सकाळी साडेदहा वाजता निकाल देणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने २६ मार्चला निकाल राखून ठेवला होता. अॅड. जयश्री पाटील यांनी मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. त्यानंतर खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी पार पडली. सर्वोच्च न्यायालयाने मुंबई हायकोर्टाच्या निर्णयाला स्थगिती दिली होती. मराठा समाजाला १२ ते १३ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय हायकोर्टाने योग्य ठरवला होता. सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती अशोक भूषण यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने मराठा आरक्षणावर सुनावणी पार पडली.


राज्यात कोरोनाचं संकट असतानाच पोलीस दलातही फेरबदल करण्यात आले आहेत. पोलीस निरीक्षक सुधीर दळवी, केदारी पवार, नंदकुमार गोपाळे आणि सचिन कदम यांची बदली करून त्यांना मुंबईबाहेर पाठविण्यात आले आहे. अचानक चार पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्यानं पोलीस दलातही खळबळ उडाली आहे.


जालना जिल्ह्यात कोविड रुग्णालयातून पळून गेलेल्या कोरोना रुग्णाचा दुचाकीवरुन जाताना टँकरच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. जालना शहरातील भाग्यनगर भागात राहणाऱ्या ४८ वर्षीय व्यक्तीचा कोरोना चाचणीचा अहवाल चार दिवसापूर्वी पॉझिटिव्ह आला होता. त्याच्यावर जालना जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र मंगळवारी दुपारच्या सुमारास त्याने रुग्णालयातून पळ काढला. परंतु औरंगाबाद रोडवर दुचाकीवरुन जाताना पाण्याच्या टँकरची धडक बसल्याने या रुग्णाचा जागीच मृत्यू झाला, असल्याचे सांगितले जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -