घरठाणेSanjay Raut : बाळराजे सुशिक्षित आहेत ना? राऊतांचा श्रीकांत शिंदेंना टोला

Sanjay Raut : बाळराजे सुशिक्षित आहेत ना? राऊतांचा श्रीकांत शिंदेंना टोला

Subscribe

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर घोटाळ्याचे आरोप केले आहेत. त्यांच्या या आरोपांनी खासदार शिंदे यांच्याकडून प्रत्युत्तर देण्यात आले. पण त्यांच्या या प्रत्युत्तराला राऊतांनीही आता सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे.

मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर घोटाळ्याचे आरोप केले आहेत. श्रीकांत शिंदे फाउंडेशनमध्ये 500 ते 600 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप करत राऊतांनी या संदर्भातील पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवले आहे. या मुद्द्यावरून राऊत वि. शिंदे अशा नव्या वादाला सुरुवात झाली आहे. राऊतांनी घोटाळ्याचा आरोप केल्यानंतर खासदार श्रीकांत शिंदे यांनी पत्राचाळीच्या आरोपी पत्र लिहित आहेत, असा टोला लगावला. त्यांच्या या टोल्याला आता संजय राऊत यांच्याकडून प्रत्युत्तर देण्यात आले. (Sanjay Raut criticizes Shrikant Shinde again on Scam Allegation)

खासदार संजय राऊत यांनी आज मंगळवारी (ता. 16 एप्रिल) खासदार श्रीकांत शिंदे यांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ते याबाबत म्हणाले की, ते नक्की सुशिक्षित आहेत ना, बाळराजेंना लिहिता वाचता येते ना, ते हाड वैद्य आहेत. त्यांनी कधी माणसांची किंवा जनावरांची हाड तपासली का, ते पाहा. मला जेव्हा न्यायालयाने सोडले, तेव्हा जे निकाल पत्र दिले आहे, ते त्यांनी वाचायला पाहिजे, मग कोण कसे घोटाळे करतात आणि राजकीय दृष्टिकोनाने कसे कोणाला अडकवले जाते, हे बाळराजेंना कळेल, असा टोला राऊतांनी लगावला आहे.

- Advertisement -

हेही वाचा… Sanjay Raut : पैसे घेऊन भ्रष्टाचाऱ्यांना अभय, राऊतांचा भाजपावर आरोप

तर, श्रीकांत शिंदे फाउंडेशनकडून आतापर्यंत 500 ते 600 कोटी रुपये गोळा करण्यात आला, त्याबद्दल त्यांनी सांगावे. त्यांची 10 वर्षातील मुख्यत: अडीच वर्षातील जी काही उधळपट्टी आहे, ती 100 कोटींच्या वर आहे. सातपुते यांनी जी तक्रार केली आहे, त्यावर आपण का बोलत नाही, असा प्रश्नच संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. तर, नरेंद्र मोदींची तुम्हाला हवा लागली आहे का, इधर-उधर की बात करो, असे टीकास्त्र राऊतांनी श्रीकांत शिंदे यांच्यावर डागले आहे.

- Advertisement -

तसेच, तुम्हाला हे पैसे कोणी दिले, त्या देणगीदारांची नावे जर तुम्ही देणार नसाल तर, आम्ही देऊ आणि त्या बदल्यात सरकारने त्यांची कोणती एक नंबर आणि दोन नंबरची कामे केली. त्यांनी खाजवायला माणसे ठेवली आहे, त्यांनी खाजवत बसावे, अशी बोचरी टीकाही राऊतांकडून करण्यात आली आहे. खासदार संजय राऊत यांनी आरोप केल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांचे पुत्र असलेले खासदार श्रीकांत शिंदे यांनी राऊतांवर पलटवार केला होता. हसायचे की रडायचे, पत्राचाळ आरोपी आता पत्र लिहायला लागले आहेत, असे वक्तव्य करत श्रीकांत शिंदेंनी राऊतांवर निशाणा साधला होता.

हेही वाचा… Lok Sabha Election 2024 : प्रचारासाठी उद्धव ठाकरेंकडून शिवसेनेचे नवीन गीत लॉन्च


Edited By : Poonam Khadtale

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -