Sunday, September 26, 2021
27 C
Mumbai
घर देश-विदेश पोटच्या मुलानं एक महिन्यात ८ किलो वजन कमी करत वडीलांना केलं यकृत...

पोटच्या मुलानं एक महिन्यात ८ किलो वजन कमी करत वडीलांना केलं यकृत दान

Related Story

- Advertisement -

लखनऊमधील एका मुलानं आपल्या जन्मदात्या वडीलांना यकृत दान करण्यासाठी स्ट्रीक डाएट प्लॅन आणि व्यायामावर अधिक मेहनत घेत एक महिन्यात तब्बल ८ किलो वजन कमी केले. त्याच्या आजारी वडीलांना यकृत प्रत्योरोपणाची तातडीने आवश्यकता होती. मात्र गरजेवेळी कुणी डोनर न सापडल्याने या मुलांने आपले यकृत वडीलांना देण्याचा निर्णय घेतला. मात्र त्याचे वजन ओव्हर वेट असल्याने तो यकृत दान करु शकत नव्हता. अशावेळी त्याने एका महिन्यात तब्बल ८ किलो वजन कमी करत वडीलांना यकृत दान केले.

ही यकृत दानाची शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून प्राप्तकर्ता आणि दाता दोघेही सुखरुप आहे. दोघांची प्रकृती पूर्णपणे ठीक असल्याने नुकतचं त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. लखनऊमधील अपोलोमेडिक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पीटलमध्ये हे यकृत प्रत्यारोपण झाले.

- Advertisement -

या रुग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि एमडी डॉ.मयंक सोमानी म्हणाले की, लखनऊमधील ४५ वर्षीय विकट सिंह अत्यंत बिकट अवस्थेत रुग्णालयात आला होता. त्याचे यकृत इतके खराब झाले की, त्याचा परिणाम त्याच्या मेंदू, फुफ्फुस आणि किडणीवर होत होता. यावेळी त्याला यकृत प्रत्यारोपणाचा सल्ला देण्यात आला. या रुग्णाच्या प्रत्योरोपणासाठी काही चाचण्या करण्यात आल्या. या चाचण्यांमध्ये असे आढळून आले की, त्याच्या २३ वर्षीय मुलाचे यकृत त्याच्याशी मिळते जुळते आहे. त्यामुळे या आजारी रुग्णाच्या पोटच्या मुलाने आपले यकृत दान करण्याचा निर्णय घेतला. परंतु त्याचे वजन ८० किलोपेक्षा जास्त असल्याने त्याच्या यकृताभोवती अतिरिक्त चरबी जमा झाली होती. याला ‘फॅटी लिव्हर’ असे म्हटले जाते.

‘फॅटी लिव्हर’ सामान्य यकृताप्रमाणे कार्य करत नसल्याने, प्रत्यारोपण शस्त्रक्रियेवेळी दात्याच्या आणि प्राप्तकर्त्यांच्या जीवाला धोका निर्माण होतो. त्यामुळे या शस्त्रक्रियेला एक महिन्याने करण्याचा निर्णय घेण्यात आला. या एक महिन्यात त्या मुलाने स्ट्रीक्ट डाएट प्लॅन आणि व्यायामावर कठोर मेहनत घेत आठ किलो वजन कमी केले. यामुळे त्याच्या यकृताचा एक भाग त्याच्या वडीलांना दान करण्यायोग्य झाला होता. यावेळी मुलाच्या यकृताचा ६० ते ६५ टक्के भाग घेण्यात आला. यात यकृतदात्याच्या सर्जरीसाठी ६ ते ७ तास लागले. तर यकृत घेणाऱ्या रुग्णाचे १६ ते १७ तासांत यकृत प्रत्यारोपण करण्यात आले असे यकृत प्रत्यारोपण सल्लागार डॉ आशिष मिश्रा यांनी सांगितले.

- Advertisement -

या रुग्णालयातील ही दुसरी यशस्वी यकृत प्रत्योरोपण शस्त्रक्रिया आहे. यापूर्वी फेब्रुवारी महिन्यात पहिली प्रत्यारोपण शस्त्रक्रिया झाली यासाठी सुमारे १७ लाख रुपये खर्च झाला. या रुग्णालयाला आता या महिन्यापासून शव प्रत्यारोपणाची परवानगीही मिळाली आहे. वरिष्ठ सल्लागार डॉ वलीउल्ला सिद्दीकी म्हणाले, “लिव्हर सिरोसिस हे प्रत्यारोपणाचे सर्वात मोठे कारण आहे. जिवंत दात्यांसाठी यकृत दान करणे धोकादायक नाही कारण अवयव सहा आठवड्यांच्या आत त्याच्या मूळ आकारात परत येतो.


Corona Third Wave : तिसरी लाट आली? महिन्याभरात सर्वाधिक मुलांना कोरोनाची लागण


 

- Advertisement -