घरताज्या घडामोडीNational Teacher Award 2021: देशातील ४४ शिक्षकांचा राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने गौरव

National Teacher Award 2021: देशातील ४४ शिक्षकांचा राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने गौरव

Subscribe

राष्ट्रपती रामनाथ कोविंद हस्ते देशातील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या शिक्षकांचा गौरव करण्यात आला

देशात आज ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिन (Teachers day) साजरा करण्यात येत आहे. या दिवशी देशातील एकूण ४४ शिक्षकांना पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. देशातील ४४ शिक्षकांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद (President Ramnath Kovind)  यांच्या हस्ते राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने (National Teacher Award 2021) गौरवण्यात आले. देशातील कोरोनाची परिस्थिती पाहता हा कार्यक्रम व्हिडिओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून आयोजित करण्यात आला होता. यावेळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद हस्ते देशातील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या शिक्षकांचा गौरव करण्यात आला.

- Advertisement -

ऑनलाईन कार्यक्रमावेळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सर्व शिक्षकांना शुभेच्छा देत देशाला राष्ट्रीय शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. ‘डॉ. सर्वपल्ली राधाकृष्ण हे एक आदर्श आणि विद्वान व्यक्ती म्हणून ओळखले जायचे. त्यांची ओळख म्हणून आज देशभरात शिक्षण दिन साजरा केला जातो. देशातील या ४४ शिक्षकांनी केलेल्या सर्वोत्तम कामगिरीसाठी त्यांना हा पुरस्कार देताना मला अत्यंत आनंद होत आहे’, असे रामनांथ कोविंद यांनी म्हटले. ‘आपल्या देशातील शिक्षण हे नागरिकांचे संवैधानिक मूल्य रुजवणारे असावे. शिक्षकांनी मुलांच्या सर्वांगीण विकासारवर भर द्यावा आणि देशात एक आदर्श निर्माण करण्याचा प्रयत्न करावा’,  असे आवाहन देखील राष्ट्रपतींनी यावेळी केले.

- Advertisement -

दरवर्षी देशातील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या शिक्षकांना हा पुरस्कार देण्यात येतो. गेल्या दीड वर्षात शाळा बंद आहेत. शिक्षक आणि विद्यार्थी ऑनलाईन शाळेच्या माध्यामातून एकमेकांना भेटत आहेत. या काळात शिक्षकांचे खरे महत्त्व मुलांना कळाले आहे. राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारची निवड प्रथम जिल्हास्तारावर करण्यात येते. त्यानंतर राज्यापातळीवर निवड केली जाऊन राज्यातून आलेल्या शिफारसीनुसार देश पातळीवर शिक्षक पुरस्कारासाठी निवड केली जाते.


हेही वाचा – Teacher Day 2021:हे स्टार्स टीचर बनून झाले सुपरहिट

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -