घरदेश-विदेशचंद्रावर पडलेला पहिल्या बुटाचा लिलाव

चंद्रावर पडलेला पहिल्या बुटाचा लिलाव

Subscribe

चंद्रावर पहिलं पाऊल ठेवणाऱ्या निल आर्मस्ट्राँग यांच्या स्पेस सुटमधला बुटाचा नुकताच लिलाव करण्यात आला आहे. ४९ हजार डॉलर्सला हा बुट विकल्या गेला आहे.

चंद्रावर पहिले पाऊलं ठेवलेले अंतराळवीर निल आर्मस्ट्राँग यांच्या स्पेस सुटचा नुकताच लिलाव करण्यात आला आहे. या लिलावात त्यांचा बुट तब्बल ४९ हजार डॉलर्सला विकला गेला आहे. आर्मस्ट्राँग यांच्या निधनानंतर त्यांच्या स्पेस सुटचा लिलाव केला गेला. निल आर्मस्ट्राँग यांनी चंद्रावर उतरतेवेळी हा बुट घातला असल्याा दावा नासाने केला आहे. आर्मस्ट्राँग यांच्या संपूर्ण स्पेस सुट १ लाख १० हजार डॉलर्सला विकला गेला आहे. आर्मस्ट्राँग यांचे फोटो आणि इतर वस्तूंचाही या लिलावात समावेश करण्यात आला होता. नासातर्फे हा लिलाव कार्यक्रम ठेवण्यात आला होता यातून मिळणारे पैसे हे संशोधनाच्या कामासाठी वापरले जाणार असल्याचे नासाने सांगितले आहे. अपोलो ११ मोहीमेअंतर्गत २० जूलै १९६९ रोजी पहिला माणूस चंद्रावर पोहोचवला गेला. चंद्रावर पहिले पाऊल टाकण्यावर त्यावेळी एक मोठे यश मानले जात होते.


निल आर्मस्ट्राँग यांनी चंद्रावर पहिले पाऊल ठेवले होते. त्यावेळी अनेकांनी यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. मात्र चंद्रावर उमटलेले पाऊलांचे ठसे आणि चंद्रावरची माती या अंतराळवीरांनी आपल्या सोबत आणली होती.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -