घरताज्या घडामोडीउत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उनची प्रकृती गंभीर; बहिणीचा दक्षिण कोरियावर आरोप

उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उनची प्रकृती गंभीर; बहिणीचा दक्षिण कोरियावर आरोप

Subscribe

कोरोनाचा संसर्ग देशभरात पसरतो आहे. या कोरोनाच्या काळात उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन यांना तीव्र ताप आला होता.

कोरोनाचा संसर्ग देशभरात पसरतो आहे. या कोरोनाच्या काळात उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन यांना तीव्र ताप आला होता. या पार्श्वभूमीवर किम जोंग उन यांच्या बहिणीने दावा केला आहे की, दक्षिण कोरियातून आलेल्या पॅम्प्लेट्समुळेच उत्तर कोरियामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव पसरला आहे. (north korea leader kim jong un seriously ill during covid19 surge tells his sister vp96)

ब्लूमबर्गच्या म्हणण्यानुसार, किम जोंग उन यांच्या बहिणीने या दाव्याचा पुनरुच्चार करत आरोप केले आहेत. दक्षिण कोरियाच्या कटपुतळे सीमेपलीकडे फुग्यांचा वापर करत गलिच्छ वस्तू पाठवत आहेत. तसेच, पॅम्प्लेट्सही पाठवतात, असा आरोप त्यांनी केला आहे.

- Advertisement -

“उत्तर कोरियासाठी फारच दुर्मिळ आहे कारण हा देश कधीही आपल्या नेत्याबद्दल कोणतीही टिप्पणी करत नाही”, असे किम यो जोंगने आपल्या भावाच्या प्रकृतीबद्दल सांगिताना स्पष्ट केले.

“किम यो जोंग यांनी त्यांच्या एका भाषणात सांगितले की, उत्तर कोरियाच्या नेत्याची तब्येत तापामुळे खूप खराब झाली होती. मात्र इतका आजारी अजूनही माझा भाऊ क्षणभरही झोपला नाही कारण त्याला त्याच्या लोकांची काळजी होती”, असेही किम यो जोंगने म्हटले.

- Advertisement -

अत्यंत वजनी आणि धुम्रपान करणाऱ्या किम जोंग उनच्या तब्येतीबाबत अनेक वर्षांपासून अंदाज बांधले जात आहेत. त्यांच्या कुटुंबात हृदयविकाराचा इतिहास आहे. गेल्या महिन्यात किम जोंग 17 दिवस त्यांच्या देशातील मीडियापासून दुर होते. तसेच, बऱ्याचदा ते उन्हाळ्यात समुद्रकिनारी असलेल्या घरी जाऊन सुट्टीचा आनंद घेत होते. बुधवारी त्यांनी सत्ताधारी पक्षाची बैठक घेतली होती. या बैठकीत त्यांनी क्वारंटाइनच्या मोठ्या लढाईवर विजय घोषित केला.


हेही वाचा – आपत्कालीन लँडिंगसाठी विमान अचानक रस्त्यावर उतरले, थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -