घरताज्या घडामोडीबर्थडे पार्टीत नर्सवर बलात्कार, फोटो सोशल मीडियावर व्हायरल!

बर्थडे पार्टीत नर्सवर बलात्कार, फोटो सोशल मीडियावर व्हायरल!

Subscribe

लॉकडाऊनमध्ये अनेक धक्कादायक घटना समोर येत आहे. दरम्यान बर्थडे पार्टीला आपल्या सोबत काम करणाऱ्या नर्सला मादक द्रव्य पाजून तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मध्य प्रदेश मधील ग्वालियार येथे ही घटना घडली आहे.

नक्की काय घडले?

या व्यक्तीने आपल्यासोबत काम करणाऱ्या नर्सला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून लग्न करण्याचे वचन दिले. मग एके दिवशी त्याने आपल्या बर्थडे पार्टीला तिला बोलावले आणि मादक द्रव्य पाजून तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर या घटनेचा त्याने फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली आणि तिचे शोषण करत राहिला. जेव्हा त्यांची मैत्री तुटली तेव्हा त्यांने फेक फेसबुक अकाऊंटवरून बलात्कारचा फोटो व्हायरल केला. तसंच या घटनेचा व्हिडिओ देखील त्याने केला होता.

- Advertisement -

ग्वालियार येथील खासगी रुग्णालयात हे दोघे कामाला होते. या घटनेनंतर या पीडितेने आरोपीविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. सध्या पोलिस आरोपींच्या शोधात आहेत. किला गेट पोलिस स्टेशनचे अधिकारी रामनरेश यादव यांनी सांगितले की, पीडितेने फेसबुकच्या माध्यमातून आरोपी अजयशी मैत्री केली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. आरोपीने पीडितेला बर्थडे पार्टीला बोलावले आणि तिला मादक द्रव्य प्यायला. त्यानंतर आरोपीने तिच्यावर बलात्कार केला. सध्या आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा शोध घेतला जात आहे.


हेही वाचा  – धक्कादायक! कैद्याने गुप्तांग कापून शिवलिंगावर केलं अर्पण!

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -