घरताज्या घडामोडीपाकिस्तानचे एफ - १६ लढाऊ विमान कोसळले

पाकिस्तानचे एफ – १६ लढाऊ विमान कोसळले

Subscribe

पाकिस्तान हवाई दलाचे एफ - १६ लढाऊ विमान कोसळल्याची मोठी दुर्घटना इस्लामाबादजवळ घडली आहे.

पाकिस्तान हवाई दलाचे एफ – १६ लढाऊ विमान कोसळल्याची मोठी दुर्घटना इस्लामाबादजवळ घडली आहे. विमान कोसळल्याने मोठा आवाज आल्याने नागरिकांनी घटनास्थळी जाऊन धाव घेतली आणि एकच खळबळ उडाली. वृत्तवाहिन्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे विमान इस्लामाबाद जवळ कोसळे असून या विमानाचा वैमानिक वाचला की नाही याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही.

- Advertisement -

सरावा दरम्यान घडली दुर्घटना

मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानमध्ये येत्या २३ मार्चला पाकिस्तानमध्ये एअर शो होणार आहे. या शोसाठी हे लढाऊ विमान सराव करत होते आणि त्या सरावा दरम्यान ही दुर्घटना झाल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, पाकिस्तानी हवाई दलाने याबाबत मौन पाळले आहे. तसेच दुर्घटनास्थळी जाण्यास बंदी केली आहे. पाकिस्तानी हवाई दल आणि स्थानिक पोलिसांकडून रेस्क्यू ऑपरेशन सुरू असल्याचे सांगितले जात आहे.

हा अपघात कसा आणि कोणत्या कारणामुळे झाला, याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही. या अपघाताचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. पाकिस्तानचे एफ – १६ विमान अमेरिकेकडून मिळाले होते. मागच्या वर्षी भारताचे शूर वैमानिक अभिनंदन यांनी या विमानाने केलेल्या हल्ल्यात चोख प्रत्युत्तर दिले होते आणि एफ – १६ लढाऊ विमानाला पाडले होते.

- Advertisement -

हेही वाचा – LIVE – करोना व्हायरस : भारतात करोनाच्या संशयिताचा मृत्यू


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -