ट्विटरवर सर्वात जास्त फॉलोअर असणाऱ्या १० जणांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा समावेश

सोशल मीडियावर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे किती लोकप्रिय आहेत, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. त्याचमुळे की काय आणखी एका सोशल मीडियाच्या १० जणांच्या यादीमध्ये पंतप्रधान मोदींचा समावेश झाला आहे.

PM Narendra Modi is among the 10 most followed people on Twitter

सोशल मीडियावर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे किती लोकप्रिय आहेत, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. त्याचमुळे की काय आणखी एका सोशल मीडियाच्या १० जणांच्या यादीमध्ये पंतप्रधान मोदींचा समावेश झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ट्विटरवर सर्वात जास्त फॉलोअर असणाऱ्या १० जणांमध्ये समावेश झाला आहे.

ट्विटर हा एक असा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे जिथे अनेक जण काकमी शब्दांत व्यक्त होत असतात. ट्विटरवर असलेल्या शब्द मर्यादांमुळे अनेक जण ट्विटर वापरणे देखील नापसंत करतात. पण याच ट्विटरवर लोकप्रिय असणा-या लोकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. महत्वाची बाब म्हणजे या यादीमध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सुद्धा समावेश झाला आहे.

जानेवारी २०२३ मध्ये ट्विटरवर सर्वात जास्त फॉलोअर असणाऱ्या लोकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. स्टॅटिस्टा डॉट कॉम या संकेतस्थळाने ही यादी जाहीर केली आहे. यामध्ये जगभरातील नेते, कलाकार, उद्योगपती आणि वेगवगेळ्या क्षेत्रातील महत्वाच्या समावेश आहे. कारण नेते, कलाकार मंडळी आणि वेगवगेळ्या क्षेत्रातील महत्वाच्या व्यक्तीच सर्वाधिक ट्विटरचा वापर करत असतात.

दरम्यान, ‘स्टॅटिस्टा डॉट कॉम’कडून जाहीर करण्यात आलेल्या यादीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव आठव्या क्रमांकावर आहे. तर या यादीमध्ये अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचा देखील समावेश आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे या यादीमध्ये फक्त दोनच राजकीय नेत्यांचा समावेश आहे, ज्यांचे ट्विटरवर सर्वाधिक फॉलोअर आहेत. तसेच या यादीमध्ये ट्विटरचे नवे मालक आणि टेस्ला कंपनीचे सर्वेसर्वा एलन मस्क यांचेही नाव आले आहे.

हेही वाचा – ऑस्ट्रेलिया कॉन्सर्ट रद्द होताच फरहान अख्तरकडे चाहत्यांनी मागितले पैसे

हल्ली इतर कोणत्याही सोशल मीडिया साईटपेक्षा ट्विटरचा वापर प्रभावीपणे होऊ लागला आहे. लोक आपली मते व्यक्त करण्यासाठी तसेच आपल्या समस्या मांडण्यासाठी ट्विटरचा वापर करू लागले असल्याचे पाहायला मिळत आहे. सध्या या यादीमध्ये अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा हे पहिल्या क्रमांकावर आहेत. तर दुसऱ्या क्रमांकावर एलन मस्क आणि तिसऱ्या क्रमांकावर प्रसिद्ध पॉप गायक जस्टिन बिबर याचा समावेश झाला आहे. तर युट्युबला दहावा क्रमांक मिळाला आहे.