घरदेश-विदेशराहुल गांधींवर आणखी एक मानहानीचा खटला, RSS ला 'कौरव' म्हणाले होते...

राहुल गांधींवर आणखी एक मानहानीचा खटला, RSS ला ‘कौरव’ म्हणाले होते…

Subscribe

राहुल गांधींवरील अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. राहुल गांधी यांच्या कोर्टामधील फेऱ्या काही संपण्याचं नाव घेत नाहीय.

माजी खासदार आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याविरोधात आणखी एक मानहानीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जानेवारी महिन्यात आयोजित केलेल्या त्यांच्या भारत जोडो यात्रेदरम्यान त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ विरुद्ध केलेल्या वक्तव्याबद्दल मानहानीचा खटला दाखल करण्यात आला आहे. आरएसएस कार्यकर्ता कमल भदोरिया यांच्या तक्रारीवरून वकील अरुण भदोरिया यांनी उत्तराखंडच्या हरिद्वार न्यायालयात खटला दाखल केला आहे. या प्रकरणाची सुनावणी १२ एप्रिल रोजी होणार आहे.

९ जानेवारी २०२३ रोजी हरियाणाच्या अंबाला इथे भारत जोडो यात्रेनंतर एका रस्त्यावरील सभेमध्ये संबोधित करताना राहुल गांधी म्हणाले होते की, “RSS चे सदस्य ’21 व्या शतकातील कौरव’ आहेत. कौरव कोण होते? मी तुम्हाला सुरूवातीला २१ व्या शतकातील कौरवांबद्दल सांगेन. ते खाकी हाफ पँट घालतात, हातात काठ्या घेतात. भारतातील २-३ अब्जाधीश कौरवांच्या पाठीशी उभे आहेत.”

- Advertisement -

हे ही वाचा: राहुल गांधीनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे द्यायला मोदी का घाबरत आहेत? – नाना पटोले

उत्तराखंडच्या हरिद्वार न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी १२ एप्रिलला होणार आहे. राहुल यांनी न्यायालयात येऊन जबाब नोंदवावा, असं न्यायालयानं म्हटलं आहे. त्यामुळे राहुल गांधींवरील अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. राहुल गांधी यांच्या कोर्टामधील फेऱ्या काही संपण्याचं नाव घेत नाहीय.

- Advertisement -

हे ही वाचा : भाजप व्यतिरिक्त सर्व पक्षांना एकत्र आणण्याचे प्रयत्न सुरू- शरद पवार

मोदी आडनाव प्रकरणात २ वर्षांची शिक्षा, खासदारकीही गमावले
यापूर्वी २३ मार्च रोजी सुरत न्यायालयाने राहुल गांधींना ‘सर्व चोरांचे आडनाव मोदी…’ या विधानाशी संबंधित मानहानीच्या प्रकरणात दोषी ठरवले होते. या निर्णयाच्या २७ मिनिटांनंतर न्यायालयाने त्याला २ वर्षांची शिक्षा सुनावली आणि १५ हजारांचा दंडही ठोठावला. काही वेळानंतर न्यायालयाने त्यांना जामीनही मंजूर केला. तसंच त्यांची शिक्षा ३० दिवसांसाठी पुढे ढकलण्यात आली. सुनावणीदरम्यान राहुल न्यायालयात हजर होता.

हे ही वाचा: राहुल गांधींसाठी काय पण! ‘या’ महिलेने इमारतच त्यांच्या नावावर केली

राहुल गांधींनी कोर्टात आपली बाजू मांडली. त्यांच्या वकिलाच्या म्हणण्यानुसार, राहुल यांनी वक्तव्य देताना माझा हेतू चुकीचा नव्हता असे सांगितले. मी भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवला होता. दुसरीकडे, आमदार आणि याचिकाकर्ते पूर्णेश मोदी आणि त्यांच्या समर्थकांनी न्यायालयाबाहेर ‘भारत माता की जय आणि जय श्री राम’च्या घोषणा दिल्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -