राकेश झुनझुनवालांचे अकासा एअर उड्डाणासाठी सज्ज, DGCA कडून मिळाली मान्यता

rakesh jhunjhunwalas akasa air open bookings for flights

भारतीय शेअर मार्केटमधील दिग्गज राकेश झुनझुनवाला यांनी गुंतवणूक केलेली अकासा एअर कंपनी आता विमान उड्डाणासाठी सज्ज झाली आहे, नुकतंच अकासा एअर कंपनीला (Akasa Air) नागरी विमान वाहतूक सेवा नियामक मंडळाकडून (Directorate General of Civil Aviation) एअरलाईन ऑपरेटर परवाना मिळाला आहे. यामुळे आता कंपनीची अधिकृत विमानसेवा लवकरचं सुरु होणार आहे.

DGCA कडून परवाना मिळाल्यानंतर अकासा एअर जुलैच्या शेवटच्या आठवड्यात आपली पहिले कर्मिशयल फ्लाइट ऑपरेशन सुरू करू शकते. 15 जुलैपासून अकासा एअरमध्ये तिकीट बुकिंग सुरू होण्याची शक्यता आहे. अकासा एअरने ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे.


DGCA कडून एअरलाईन परवाना मिळताच Akasa Air ने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर लिहिले की, आम्हाला आमचे एअर ऑपरेटर प्रमाणपत्र (AOC) मिळाल्याची घोषणा करताना आनंद होत आहे. हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. आता आम्ही कर्मिशयल फ्लाइट ऑपरेशन सुरू करू शकणार आहोत.

कर्मिशयल ऑपरेशन सुरू करण्यापूर्वी अकासा एअरलाईन्सने DGCA कडून एअर ऑपरेटर परमिटसाठी अर्ज केला होता, जो एअरलाइन्स क्षेत्राचा नियामक होता. अकासा एअरच्या Proving Flight ने एअर ऑपरेटर सर्टिफिकेट मिळवण्यासाठी आणि एविएशन रेग्युलेटर DGCA चे समाधान करण्यासाठी अनेक वेळा उड्डाण केले. या Proving Flight मध्ये डिजीसीएचे अधिकारी आणि अकासा एअरलाईन्सचे अधिकारी प्रवासी म्हणून प्रवास करत होते. यासोबत काही क्रेबिन क्रू मेंबरही होते.

21 जून 2022 रोजी अकासा एअरचे पहिले बोईंग 737 मॅक्स हे विमान दिल्ली विमानतळावर उतरले. हे विमान 16 जून रोजी अमेरिकेतील सिएटल येथे अकासा एअरकडे सुपूर्द करण्यात आले. अकासा एअरने गेल्या नोव्हेंबरमध्ये बोईंगला ऑर्डर केलेल्या 72 बोइंग 737 MAX विमानांची ही पहिली डिलिव्हरी आहे.


३६ वर्षांपूर्वीच्या प्रकरणात राज बब्बर यांना २ वर्षांची शिक्षा