घरदेश-विदेशदोन गोळ्या लागूनही आरजेडी नेता स्वत: पोहचला हॉस्पिटलमध्ये 

दोन गोळ्या लागूनही आरजेडी नेता स्वत: पोहचला हॉस्पिटलमध्ये 

Subscribe

जखमी झालेल्या रामकृपाल यांच्यावर शहरातील कल्पना नर्सिंग होममध्ये उपचार सुरु आहेत. त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे.

बिहारमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. जनता दलाच्या नेत्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. जनात दलाचे नेते रामकृपाल मोहतो असं या जनता दलाच्या नेत्याचे नाव आहे. रामकृपाल मोहतो बाईकवरुन त्यांच्या मुलीला सोडण्यासाठी परिक्षा केंद्रावर गेले होते. त्याच दरम्यान, बाईकवरुन आलेल्या ६ ते ७ गुंडांनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. या गुंडांनी आधी रामकृपाल मोहतो यांना अडवले त्यानंतर त्यांच्या डोक्यावर बंदूक लावली. त्याचवेळी रामकृपाल यांच्या पाठीमागे बाईकवर बसलेल्या त्यांच्या मुलीने बंदुक अडवली. यावेळी झालेल्या झटापटीमध्ये बंदूकीतून गोळी सुटली आणि ती गोळी रामकृपाल यांच्या छातीत घुसली

रामकृपाल यांची प्रकृती गंभीर

आरोपींनी रामकृपाल यांच्या छातीत दोन गोळ्या मारल्या. जखमी झालेल्या रामकृपाल यांनी मुलीला परिक्षा केंद्रावर सोडून स्वत: जखमी अवस्थेत हॉस्पिटलमध्ये गेले. जखमी झालेल्या रामकृपाल यांच्यावर शहरातील कल्पना नर्सिंग होममध्ये उपचार सुरु आहेत. त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. रामकृपाल यांच्यावर झालेल्या गोळीबाराच्या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. दरम्यान, हा हल्ला राजकीय वादातून झाला असल्याची सर्चा सुरु आहे.

- Advertisement -

पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरु

बिहारमध्ये दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत चालली आहे. दिवसा ढवळ्या लुटमार, हत्या, बलात्कार आणि दरोडा यांसारख्या घटना घडत आहेत. काही दिवसांपूर्वीच गुंड शहाबुद्दीन याच्या पुतण्याची भर दिवसा बस स्टँडवर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. ही घटना ताजी असतानाच बुधवारी ही घटना घडली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध सुरु आहे.

हेही वाचा – 

- Advertisement -

जमिनीच्या वादातून महामार्गावर गोळीबार

मुंबई पोलीस मुख्यालयात चुकून सुटलेल्या गोळीबारात एक जखमी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -