घरदेश-विदेशपायलटच्या केबिनमधून धूर आल्याने स्पाईसजेट विमानाची इमर्जन्सी लँडिंग

पायलटच्या केबिनमधून धूर आल्याने स्पाईसजेट विमानाची इमर्जन्सी लँडिंग

Subscribe

दिल्लीहून जबलपूरला येणाऱ्या स्पाईसजेट विमानातून अचानक धूर निघू लागल्याने या विमानाचे दिल्ली विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले आहे. ही घटना आज सकाळच्या सुमारास घडली आहे. घटनेवेळी प्रत्यक्षात विमान 500 फूट उंचीवर होते यावेळी अचानक केबिनमधून धुराचे लोट पसरु लागले. यानंतर संपूर्ण विमान धुराने भरले. विमानात अचानक धुराचे लोट पसरल्याने प्रवाशांमध्येही एकच गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. याया घटनेबाबत स्पाइसजेटच्या प्रवक्त्याने सांगितले की, सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे दिल्ली विमानतळावर उतरवण्यात आले आहे. या विमानाने दिल्ली विमानतळावरून सकाळी 6.15 वाजता उड्डाण केले होते.

न्यूज एजन्सी एएनआयने एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये केबिनमधून धूर येताच प्रवासी वर्तमानपत्रे आणि एअरलाईन बुकलेटसह धूरपासून आपले संरक्षण करण्याचा प्रयत्न करत आहेत. अचानक आलेल्या धुरामुळे विमानातील प्रवासी देखील काही वेळासाठी घाबरले. यावेळी परिस्थितीचे गांभीर्य ओळखत पायलटने विमान पुन्हा दिल्ली विमानतळावर उतवरण्याची परवानगी घेतली आणि यानंतर विमानाचे पुन्हा दिल्ली विमानतळावर सुरक्षितरित्या आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. यानंतर विमानातील सर्व प्रवाशांना तात्काळ सुरक्षित बाहेर काढण्यात आले.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, विमानात धुराचे लोट पसरताच प्रवासी घाबरले आणि त्यांनी आरडाओरडा करणयास सुरुवात केली. विमान उडवत असलेल्या वैमानिकानेही परिस्थितीचा आढावा घेतला आणि त्यानंतर विमान सुरक्षित इमर्जन्सी लँडिंगसाठी दिल्ली विमानतळावर परत आणले.


सत्ता गेल्यानंतर शिवसेना पक्ष वाचवण्यासाठी प्रयत्न; पदाधिकारी, नगरसेवकांकडून घेतले जाणार निष्ठेचं प्रतिज्ञापत्र


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -