मी चौकशींच्या बाबतीत निडर; संजय राऊतांचा विरोधकांना टोला

sanjay raut

“स्वाभिमानाच्या गोष्टी करायच्या, हिंदूत्वाच्या गोष्टी करायच्या आणि अशापद्धतीने वागायचे, हे आमच्या रक्तात नाही. “प्राण जाए पण वचन ना जाए”, हे आम्हाला बाळासाहेबांनी शिकवले. त्यामुळे मी या चौकश्यांच्या बाबतीत निडर आहे”, असे शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी म्हटले. शुक्रवारी संजय राऊत यांची अंमलबजावणी संचालनालयाने शुक्रवारी १० तासांहून जास्त काळ चौकशी केली. या पार्श्वभूमीवर आज संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. (shivsena Sanja raut talks on ed)

प्रासरमाध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, “आपल्याला जाणूनबुजून अडकवले जातेय. त्यावेळी आपला अंतरात्मा आपल्याला सांगत असतो की, आपण काही केलेले नाही त्यामुळे कुठलीही चौकशी असो, त्याला सामोरे गेले पाहिजे. त्याच आत्मविश्वासाने मी चौकशीला गेलो आणि १० तासांनी बाहेर आलो. गुवाहटीला जाण्याचा मलाही मार्ग होता. पण मी नाही गेलो. आमची शिवसेना, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबरोबर राहिलो.”, असे म्हटले.

“स्वाभिमानाच्या गोष्टी करायच्या, हिंदूत्वाच्या गोष्टी करायच्या आणि अशापद्धतीने वागायचे, हे आमच्या रक्तात नाही. “प्राण जाए पण वचन ना जाए”, हे आम्हाला बाळासाहेबांनी शिकवले. त्यामुळे मी या चौकश्यांच्या बाबतीत निडर आहे आणि मित्रांनाही सांगत असतो की, सत्य तुमच्या बाजूने असेल तर, घाबरायचे कारण नाही. मी ईडी कार्यालयात गेल्यावर अधिकाऱ्यांना पूर्णपणे सहकार्य केले.”, असेही म्हटले.

“माझ्या तोंडात अजून उपमुख्यमंत्री हा शब्द बसला नाही आहे. माजी मुख्यमंत्री किंवा भावी मुख्यमंत्री आपण सतत आपण त्यांना बोलत राहिलो. पण ‘उप’ हा शब्द त्यांच्या मागे लावायला मला जड जात आहे. तरीही देवेंद्रजींच्या संदर्भात असं काही होत असेल तर त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे. ते मुख्यमंत्रीपदाच्या तयारीत होते. पक्षाच्या बैठकीत त्यांचे नाव जवळपास फिक्स झाले होते. पण त्यांना दुसऱ्या क्रमांकाचे पद स्वीकारा असे सांगितले जाते. जे आता मुख्यमंत्री झाले ते फडणवीसांच्या मंत्रिमंडळात ज्युनिअर मंत्री होते. पण भाजपमध्ये शिस्त आणि आदेशाचे पालन केले जाते. त्यानुसार ते वागले. त्यांचे कौतुक केले पाहिजे”, असेही राऊतांनी म्हटले.

शुक्रवारी दुपारी ११.४५ वाजेच्या सुमारास संजय राऊत चौकशीसाठी ईडी कार्यालयात पोहचले होते. गोरेगावच्या पत्राचाळ घोटाळाप्रकरणी त्यांची चौकशी करण्यात येत आहे. २ दिवसांपूर्वीच त्यांना ईडीकडून चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले होते.


हेही वाचा – संजय राऊतांची १० तासांहून अधिक काळ ईडी चौकशी