घरताज्या घडामोडीअफगाणिस्तानात तालिबान सरकारची घोषणा, मुल्ला अखुंद होणार पंतप्रधान

अफगाणिस्तानात तालिबान सरकारची घोषणा, मुल्ला अखुंद होणार पंतप्रधान

Subscribe

तालिबान्यांनी सरकार स्थापन केलं असून जगातील ५ देशांना सरकार स्थापनेच्या कार्यक्रमाचे आमंत्रण पाठवलं आहे.

तालिबानने अफगाणिस्तानमध्ये सत्ता स्थापित केल्यानंतर अफगाणिस्तानच्या नव्या सरकारची घोषणा करण्यावरुन चर्चा सुरु होत्या. मात्र आता तालिबानने अफगाणिस्तान सरकारची घोषणा केली असून मुल्ला मोहम्मद हसन अखुंदला पंतप्रधान करण्यात येणार आहे. तालिबान सरकारचे मुल्ला अखुंद पंतप्रधान असणार आहेत. तालाबानचे प्रवक्ते जबीहुल्लाह मुजाहीद यांनी हे अंतरिम सरकार असल्याची माहिती दिली आहे. तालिबानने सरकार स्थापित केलं असून त्यांच्या नेत्यांना मंत्रिमंडळांची जबाबदारीही देण्यात आली आहे. मुल्ला बरादर हे पंतप्रधान पदाच्या चर्चेत होते मात्र बरादर आता तालिबान सरकारमध्ये उपपंतप्रधान असणार आहेत. तालिबानचे गृहमंत्री अमेरिकेच्या मोस्ट वॉन्टेड लिस्टमध्ये आहेत.

अफगाणिस्तानमध्ये तालिबानने सरकार स्थापन केलं असून आमच्या देशातील नागरिक नव्या सरकारच्या स्थापनेसाठी अतुर असल्याची माहिती तालिबानचे प्रवक्ते जबीहुल्लाह मुजाहीद यांनी दिली आहे. तसेच हे अंतरिम सरकार असल्याचे त्यांनी स्पष्ट केलं आहे. अफगणिस्तानचे पंतप्रधान अखुंद हे रहबारी शूराचा प्रमुख आहेत. रहभारी शूरा ही संस्था तालिबान संबंधित आहे. मुल्ला अखुंदचा जन्म कंदहारमध्ये झाला असून तिथेच तालिबानमध्ये प्रवेश केला आहे. तालिबानी समर्थकांमध्ये मुल्ला अखुंदच्या शब्दाला प्रचंड मान आहे. तर तालिबान सरकारमधील गृहमंत्री सिराजुद्दीन हक्कानी यांच्यावर अमेरिकेच्या एफबीआयने ५० लाख डॉलरचे बक्षीस ठेवलं असून हक्कानीचे नाव मोस्ट वॉन्टेड लिस्टमध्ये आहे.

- Advertisement -

असं आहे तालिबानचे मंत्रिमंडळ

सिराजुद्दीन हक्कानी – काळजीवाहू गृहमंत्री
मुल्ला याकूब – संरक्षण मंत्री
अमीर मुत्तकी – परराष्ट्र मंत्री
खेरउल्लाह खैरख्वा – सूचना व प्रसारण मंत्री
अब्दुल हकीम – कायदे मंत्री
शेर अब्बास स्टानिकजई – उप परराष्ट्र मंत्री
जबिउल्लाह मुजाहिद – उप सूचना

तालिबानकडून ५ देशांना आमंत्रण

तालिबान्यांनी सरकार स्थापन केलं असून जगातील ५ देशांना सरकार स्थापनेच्या कार्यक्रमाचे आमंत्रण पाठवलं आहे. यामध्ये चीन, पाकिस्तान, रशिया, इराण, कतार आणि टर्की या देशांना आमंत्रित करण्यात आलं आहे. हे देशही तालिबान्यांशी संपर्कात असल्याचे सांगितले जात आहे. अफगाणिस्तानमधील कामकाज भारत, अमेरिकेने बंद केलं असून चीन, रशिया टर्की या देशांनी अद्यापही दूतवासातील कामकाज निर्भीडपणे सुरुच ठेवलं आहे. असं असले तरी तालिबानने अद्याप भारतीय दूतवासाशी संपर्क साधला नाही आहे. यामुळे भारताला अद्याप निमंत्रित करण्यात आलं नाही.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -