घरदेश-विदेशनवीन संसद भवनाचे उद्घाटन राष्ट्रपतींच्या हस्ते करावे; राहुल गांधींचा पंतप्रधानांना विरोध

नवीन संसद भवनाचे उद्घाटन राष्ट्रपतींच्या हस्ते करावे; राहुल गांधींचा पंतप्रधानांना विरोध

Subscribe

पंतप्रधानांनी नवीन संसद भवनाचे उद्घाटन करू नये, असे ट्विट राहुल गांधी यांनी केले आहे. नवीन संसद भवनाचे उद्घाटन राष्ट्रपतींनी करावे, असेही त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. उल्लेखनीय बाब अशी की, नुकतेच लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली होती. स्पीकर ओम बिर्ला यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली आणि नवीन संसद भवनाचे उद्घाटन करण्याचा आग्रह केला.

नवीन संसद भवनाचे बांधकाम पूर्ण झाले आहे. वीर सावरकर यांच्या जयंतीदिनी 28 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाच्या नव्या संसदेचे उद्घाटन करणार आहेत. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी 28 मे रोजी पंतप्रधान मोदींच्या हस्ते संसद भवनाच्या उद्घाटनाबाबत माहिती दिली होती. यावरून आता राजकारणही तीव्र झाले आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विट करून सरकारला घेरले आहे. ( The new Parliament House should be inaugurated by the President Rahul Gandhi s demand )

पंतप्रधानांनी नवीन संसद भवनाचे उद्घाटन करू नये, असे ट्विट राहुल गांधी यांनी केले आहे. नवीन संसद भवनाचे उद्घाटन राष्ट्रपतींनी करावे, असेही त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. उल्लेखनीय बाब अशी की, नुकतेच लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली होती. स्पीकर ओम बिर्ला यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली आणि नवीन संसद भवनाचे उद्घाटन करण्याचा आग्रह केला.

- Advertisement -

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची विनंती मान्य केली होती. वीर सावरकरांच्या जयंतीदिनी 28 मे रोजी ते देशातील नवीन संसद भवनाचे उद्घाटन करतील. पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमाची आणि संसद भवनाच्या उद्घाटनाची तयारीही जोरात सुरू झाली आहे. त्याचवेळी पंतप्रधानांच्या हस्ते संसदेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनाबाबतही राजकारण तापले आहे.

विरोधी पक्ष काँग्रेसनेही संसद भवनाच्या उद्घाटनाची तारीख निश्चित केल्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार जयराम रमेश यांनी ट्विट करून सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकास्त्र सोडले. जयराम रमेश यांनी पंतप्रधान मोदींचा फोटो ट्विट केला आणि नवीन संसद भवनाचे आर्किटेक्ट आणि डिझायनर म्हणून त्यांचे वर्णन केले.

- Advertisement -

( हेही वाचा: Morning Consult survey : पंतप्रधान मोदींची लोकप्रियता वाढली, जगभरात क्रमांक एकवर )

नवीन संसद भवन 28 महिन्यांत पूर्ण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 10 डिसेंबर 2020 रोजी नवीन संसद भवनाच्या बांधकामाची पायाभरणी केली होती. या कामासाठी संसदेची दोन्ही सभागृहे, राज्यसभा आणि लोकसभा यांनी 5 ऑगस्ट 2019 रोजी विनंती केली होती. सुमारे 1 हजार 200 कोटी रुपये खर्चून बांधलेल्या चार मजली संसद भवनात लोकसभेच्या 888 आणि राज्यसभेच्या 384 सदस्यांसाठी आसनव्यवस्था असेल. नवीन संसद भवनात विश्रामगृह, ग्रंथालय, समिती कक्ष तसेच सदस्यांसाठी पार्किंगसाठी पुरेशी जागा असणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -