घरदेश-विदेशफेक मेसेजेमुळे ट्राफिक पोलीस हैराण

फेक मेसेजेमुळे ट्राफिक पोलीस हैराण

Subscribe

दिल्ली पोलिसांचा नंबर सर्वाधिक व्हायरल झाला असून त्यावर दिवसभरात अनेक फोन येत असतात. फोन आल्यानंतर तातडीने मदत देण्याचा प्रयत्न केला जातो

सोशल मीडियाने सध्या ट्राफिक पोलिसांना चांगलेच हैराण केले आहे. लोकांच्या मदतीसाठी सोशल प्लॅटफॉर्मवर सुरु केलेल्या अकाऊंटसवर मदतीसाठी लोकांनी मेसेज केले खरे… पण सत्यता तपासता तपासता पोलिसांच्या नाकी नऊ आले. कारण १८ हजार ६१७ मेसेज पैकी हजारच्या घरातील मेसेज हे खरे होते. तर उरलेले सगळे मेसेज हे फेक होते. यातील खऱ्याचा तपास करता करताच पोलिसांची दमछाक झाली आहे. हा सगळा प्रकार दिल्लीत घडला असून यावर तोडगा काढण्याचे काम देखील पोलीस युद्धपातळीवर करत आहेत.

वाचा –आता फक्त ५ जणांनाच मेसेज फॉरवर्ड करता येणार!

फेक मेसेज वाढवतात कामाचा ताण

दिल्लीतील गुन्हेगारीची आकडेवारी पाहता लोकांना तात्काळ मदत मिळावी यासाठी दिल्लीत सोशल मीडियावर पोलीस सतत चौकस असतात. विशेषत: व्हॉटसअॅपच्या माध्यमातून अनेक तक्रारी येत असतात. व्हॉटसअॅप, ट्विटर आणि फेसबुकवर आलेले ७० टक्के फोन हे बोगस होते. त्यात सर्वाधिक फेक मेसेज आणि कॉल हे व्हॉटसअॅपवर होते. या सगळ्यात पोलिसांचा वेळ वाया गेलाच. शिवाय डोक्याला तापही अधिकच झाला.

- Advertisement -

फेक कॉल, मेसेजचा आकडा वाढता

दिल्ली ट्राफिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या १५ दिवसात ७हजार ४७ फोन कॉल्स आले. त्यातील १ हजार ६९९ फोन कॉल्स हे अधिक गंभीर होते आणि त्यांना तातडीच्या मदतीची गरज होती. शिवाय फेसबुक पेजवर दिल्ली पोलिसांनी ४३० तक्रारी नोंदवल्या असून त्यातील २१८ तक्रारी संदर्भात कारवाई करणे महत्वाचे होते.

वाचा –फेकन्यूजवर आळा घालणार व्हॉट्सअॅपचे ‘हे’ नवे फीचर

दिल्ली पोलिसांचा नंबर व्हायरल

दिल्ली पोलिसांचा नंबर सर्वाधिक व्हायरल झाला असून त्यावर दिवसभरात अनेक फोन येत असतात. फोन आल्यानंतर तातडीने मदत देण्याचा प्रयत्न केला जातो. ऑपरेटर तक्रारदार व्यक्तिच्या नजीकच्या ट्राफिक पोलिसांना संपर्क केला जातो आणि मदत दिली जाते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -