घरदेश-विदेशस्वातंत्र्याचा अमृत महोत्सव : खासदारांच्या तिरंगा बाइक रॅलीकडे विरोधकांची पाठ, भाजपाची टीका

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव : खासदारांच्या तिरंगा बाइक रॅलीकडे विरोधकांची पाठ, भाजपाची टीका

Subscribe

नवी दिल्ली : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राजधानी दिल्लीत खासदारांची तिरंगा बाइक रॅली काढण्यात आली होती. पण या रॅलीमध्ये विरोधी पक्षांमधील एकही खासदार सहभागी झाला नव्हता. त्यावरून भाजपाने जोरदार टीका केली आहे.

- Advertisement -

भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षं पूर्ण होत असल्यानिमित्त केंद्र सरकारकडून जोरदार तयारी सुरू केली आहे. ‘हर घर तिरंगा’ अभियानाअंतर्गत १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान प्रत्येक घरावर तिरंगा फडकावण्याचे उद्दिष्ट्य आहे. या “हर घर तिरंगा’ या विशेष अभियानात सहभागी होऊन सर्वांनी या काळात आपल्या घरावर तिरंगा ध्वज फडकवून या अभियानाचा हिस्सा बना. तसेच सोशल मीडियावरील आपल्या अकाऊंटचा प्रोफाईल फोटो म्हणून तिरंगा ठेवण्याचे आवाहनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी ‘मन की बात’ या कार्यक्रमाद्वारे केले आहे.

तर आज खासदारांची लाल किल्ला ते विजय चौक या दरम्यान तिरंगा बाइक रॅली काढण्यात आली. उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी या ‘हर घर तिरंगा’ बाइक रॅलीला हिरवा झेंडा दाखवला. यात अनेक केंद्रीय मंत्री देखील सहभागी झाले होते. या रॅलीमध्ये विरोधी पक्षांचा एकही खासदार सहभागी झाला नाही, असा आरोप भाजपाने केला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – सुप्रीम कोर्ट सुनावणी: दोन तृतीयांश लोक पक्षावर दावा करू शकत नाहीत, सिब्बलांनी व्याख्याच वाचून दाखवली

Manoj Joshi
Manoj Joshihttps://www.mymahanagar.com/author/mjoshi/
प्रिंट, चॅनल आणि डिजिटल या तिन्हीचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -