घरट्रेंडिंगनऊ सेकंद, चार स्फोट आणि भ्रष्टाचाराचे ट्वीन टॉवर अखेर जमीनदोस्त

नऊ सेकंद, चार स्फोट आणि भ्रष्टाचाराचे ट्वीन टॉवर अखेर जमीनदोस्त

Subscribe

आज सकाळी सात वाजताच आजूबाजूच्या इमारतींमध्ये राहणाऱ्या लोकांना इतर ठिकाणी स्थलांतरीत करण्यात आले. त्यांना आता सायंकाळी सात वाजता त्यांच्या इमारतीत प्रवेश मिळेल. 

नोएडा – देशातील सर्वांत मोठे ट्वीन टॉवर (Twin Tower) अखेर जमीनदोस्त झाले आहे. अवघ्या ९ सेकंदात ३२ मजली इमारतींची धुळधाण झाली. इमारतीच्या मजल्यांवर ठेवलेली स्फोटकं उडाल्याने प्रत्येक मजल्यावरून धूळ बाहेर फेकली गेली आणि क्षणार्धात इमारत जमीनीवर कोसळली. ट्विन टॉवर पाडण्यासाठी जेट डेमोलिशन, एफिस इंजीनिअरिंग आणि सीबीआरईच्या ४६ जणांची टीम कार्यरत होती.

हेही वाचा – गणेशोत्सवाच्या धामधुमीत अमित शहा येणार मुंबई दौऱ्यावर, लालबागच्या राजाचं घेणार दर्शन

- Advertisement -

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अनधिकृत बांधकाम आणि भ्रष्टाचारप्रकरणी नोएडातील सेक्टर 93-ए मधील सुपरटेक एमराल्ड कोर्टमधील १०३ मीटर उंच एपेक्स (Apex) आणि ९७ मीटर उंच सियान (Ceyanne) टॉवर आज अखेर पाडण्यात आले. चोख नियोजन आखून हे पाडकाम करण्यात आले. यासाठी ३७०० स्फोटकांचा वापर करण्यात आला. इमारत पाडताना कोणताही अडथळा येऊ नये याकरता नियमित प्रात्यक्षिकही झाले होते. त्यामुळे इमारत कोसळल्यानंतर आजूबाजूच्या परिसराला धोका पोहोचला नाही. आज सकाळी सात वाजताच आजूबाजूच्या इमारतींमध्ये राहणाऱ्या लोकांना इतर ठिकाणी स्थलांतरीत करण्यात आले. त्यांना आता सायंकाळी सात वाजता त्यांच्या इमारतीत प्रवेश मिळेल.


५०० मीटरमधील इमारती रिकाम्या करण्यात आल्या होत्या. तर, काही इमारतींना झाकून ठेवण्यात आलं होतं. बरोबर २ वाजून ३० मिनिटांनी पहिला स्फोट झाला. सियान या २९ मजली इमारतीच्या खाली हा स्फोट झाला. यानंतर एकामागून एक मजले जमीनदोस्त झाली. पापणी लवण्याच्या काळात ही जमीन मातीमोल ठरली. तर, त्यानंतर लागलीच ३२ मजल्यांची एपेक्स टॉवरमध्ये स्फोट झाला. ही इमारतीच्याही खालीच स्फोट झाला. त्यानंतर आठ ते नऊ सेकंदाच्या आत दोन्ही इमारतींचा केवळ मलबा उरला. ट्वीन टॉवर कोसळताच आजूबाजूच्या परिसरात धुराळा उडाला. एक्स्प्रेस वेपर्यंत याचा धुराळा दिसत होता. धुराळा कमी करण्याकरता पाण्याचा फवारा करण्यात येत आहे. धूर कमी झाल्यानंतर तज्ज्ञांची टीम त्याठिकाणी पोहोचून परीक्षण करणार आहे. देशातील ही पहिली इमारत आहे जी अशाप्रकारे उद्ध्वस्त करण्यात आली. भ्रष्टाचाराच्या या इमारती पडताना पाहण्यासाठी स्थानिकांनी गर्दी होती. आजूबाजूच्या इमारतीवरील गच्चीवर जाऊन त्यांनी इमारती पडताना पाहिलं.

- Advertisement -


एफिस कंपनीचे इंडियन ब्लास्ट चेतन दत्ता यांनी एक ट्रिगर दाबताच ही इमारत मातीमोल झाली. इमारतींपासून ५० ते ७० मीटर अंतरावरून त्यांनी ट्रिगर दाबले. त्यानंतर दोन्ही टॉवर ९ ते १३ सेकंदांच्या आत कोसळल्या. वॉटर फॉल इम्प्लोजनच्या पद्धतीनुसार या दोन्ही इमारती पाडण्यात आल्या आहेत. या दोन्ही इमारतींपासून अवघ्या नऊ मीटर अंतरावर आणखी एक इमारत होती. त्या इमारतीला धोका पोहोचू नये म्हणून खबरदारी घेण्यात आली होती, अशी माहिती एफिस इंजिनिअरींच्या अधिकाऱ्यांनी दिली.

नोएडाचे सीईओ रितू महेश्वरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, इमारत पाडल्यानंतर आजूबाजूच्या क्षेत्रात कोणतीही हानी झालेली नाही. मात्र, रस्त्यांवर ढीगारा साचरा आहे. तासाभरात रस्ते मोकळे होतील.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -