घरताज्या घडामोडीUGC NET Exam 2021: यूजीसी नेट परीक्षा स्थगित, केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल...

UGC NET Exam 2021: यूजीसी नेट परीक्षा स्थगित, केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांची घोषणा

Subscribe

यूजीसी नेट परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले होते.

देशात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने CBSE बोर्डाच्या दहावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत.तर बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्यात येणार आहेत तसेच ICSE बोर्डाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र सरकारने बोर्डाच्या दहावीच्या परीक्षा रद्द केल्या आहेत तर बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशनकडून घेतली जाणारी नीट पीजी परीक्षा देखील पुढे ढकलण्यात आली आहे. कोरोना परिस्थिती नियंत्रणात आल्यावर विद्यार्थ्यांना १५ दिवसांचा वेळ देऊन परीक्षा घेण्यात येणार असल्याचे केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांनी म्हटले आहे.

केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी ट्विट करत म्हटले आहे की, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे विद्यार्थी आणि शिक्षकांच्या आरोग्याच्या विचार करता एनटीए यूजीसी नेट डिसेंबर २०२० परीक्षा स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. परीक्षार्थ्यांना परीक्षा घेण्याबाबतची माहिती ugcnet.nta.nic.in या संकेतस्थळावर देण्यात येणार आहे.

- Advertisement -

यूजीसी नेट परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले होते. २ ते १७ मे २०२१ या कालावधीत होणार होत्या परंतु त्या परीक्षा आता स्थगित करण्यात आल्या आहेत. यूजीसी नेट ही परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी परीक्षार्थ्यांनी केली होती. यूजीसी म्हणजेच नॅशनल टेस्टिंग एजन्सी अंतर्गत सहायक प्राध्यापक पदासाठी परीक्षा घेण्यात येते. परंतु कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे ही परीक्षा पुढे ढकलण्यात यावी अशी मागणी देशातील विद्यार्थ्यी करत होते.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -