युक्रेनमधील एका शॉपिंग सेंटरवर क्षेपणास्त्र हल्ला; १० ठार ४० जखमी

रशियन क्षेपणास्त्राने युद्धग्रस्त युक्रेनमधील एका शॉपिंग सेंटरवर हल्ला केल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. सोमवारी ही घटना घडली आहे. या हल्ल्यात १० जणांचा मृत्यू झाला आहे, तर ४० जण जखमी झाले आहेत.

रशियन क्षेपणास्त्राने युद्धग्रस्त युक्रेनमधील एका शॉपिंग सेंटरवर हल्ला केल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. सोमवारी ही घटना घडली आहे. या हल्ल्यात १० जणांचा मृत्यू झाला आहे, तर ४० जण जखमी झाले आहेत. (Ukrainian Mall Kills 10 Wounds More Than 40)

हा हल्ला मध्य युक्रेनच्या क्रेमेनचुक शहरात झाला आहे. या घटनेचे अनेक व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर समोर आले आहेत.

याबाबत युक्रेनचे अध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्ला झाला तेव्हा तेथे १००० हून अधिक लोक होते. रशियाकडून कोणत्याही दयाळूपणाची किंवा मानवतेची अपेक्षा करणे निरर्थक आहे.

‘या हल्ल्यात अनेकांचा मृत्यू झाला असून अनेक लोक जखमी झाले आहेत. पण त्यांनी घातपाताचा आकडा दिला नाही. रशियाच्या आक्रमणापूर्वी क्रेमचुक हे युक्रेनचे मोठे औद्योगिक शहर होते. येथे युक्रेनची सर्वात मोठी रिफायनरी आहे.’, असे या घटनेबाबत शहराचे महापौर विटाली मेलेत्स्की यांनी सांगितले.


हेही वाचा – राष्ट्रपतीपदाचे उमेदवार यशवंत सिन्हांना ‘एआयएमआयएम’चा पाठिंबा; असदुद्दीन ओवैसीची घोषणा