घरAssembly Battle 2022UP Election: मतदानापूर्वी शिवपाल यादवांनी घेतला मुलायम यादवांचा आशीर्वाद; म्हणाले, 'आमची युती...

UP Election: मतदानापूर्वी शिवपाल यादवांनी घेतला मुलायम यादवांचा आशीर्वाद; म्हणाले, ‘आमची युती ३०० जागा जिंकून मोठा विजय मिळवेल’

Subscribe

आज उत्तर प्रदेशमध्ये तिसऱ्या टप्प्यात १६ जिल्ह्यातील ५९ जागांवर मतदान होत आहे. या टप्प्यातील एकूण मतदारांची संख्या २.१५ (२,१५,७५,४३०) कोटी आहे.

उत्तर प्रदेशमध्ये (UP Election) आज तिसऱ्या टप्प्यात (third phase) मतदान सुरू आहे. यादरम्यान पीएसपीचे नेते शिवपाल सिंह यादव (PSP leader Shivpal Singh Yadav) यांनी आज सकाळी इटावामध्ये (Etawah) समाजवादी पार्टीचे अध्यक्ष मुलायम सिंह यादव (SP Patron Mulayam Singh Yadav) यांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. शिवपाल यादव उत्तर प्रदेशच्या इटावा जिल्ह्यातील जसवंत नगरमधून निवडणूक लढवत आहेत. त्यांनी मुलायम सिंह यादव यांच्यासोबत झालेल्या भेटीचा फोटो आपल्या ट्विटर हँडलवर शेअर करत लिहिले की, ‘आमच्या सर्वांची प्रेरणा आणि ऊर्जाचे स्रोत आदरणीय नेताजींचे आशीर्वाद घेतले.’

- Advertisement -

तसेच एएनआय वृत्तसंस्थेसोबत बोलताना शिवपाल म्हणाले की, ‘या निवडणुकीत आम्ही मोठा विजय मिळवून, असा मला विश्वास आहे. तसेच आमच्या युतीला (प्रगतशील समाजवादी पार्टी (लोहिया) आणि समाजवादी पार्टी ) ३०० जागा मिळतील,’ असे मला वाटते.

उत्तर प्रदेशातील तिसऱ्या टप्प्यातील मतदान सुरू होण्यापूर्वी शिवपाल यादव यांनी जनतेला आवाहन करत सांगितले की, ‘माझे जनतेला आवाहन आहे की, त्यांनी समाजवादी पार्टीला मतदान करा. मी चांगल्या मताने विजयी होईल, असा मला वाटतो. अखिलेश यांना माझा पूर्ण आशीर्वाद आहे. ते युतीमध्ये मुख्यमंत्री होणारच.’

- Advertisement -

दरम्यान आज तिसऱ्या टप्प्यात १६ जिल्ह्यातील ५९ जागांवर मतदान होत आहे. या टप्प्यातील एकूण मतदारांची संख्या २.१५ (२,१५,७५,४३०) कोटी आहे. ज्यामधील १,१६,१२,०१० पुरुष मतदार आणि ९९,६२,३२४ महिला मतदार आहेत. तर ५९ जागांवर होणाऱ्या मतदानासाठी एकूण ६२७ उमेदवार मैदानात आहेत. यामध्ये ५३१ पुरुष उमेदवार आणि ९६ महिला उमेदवार आहेत.

गुरुवारी समाजवादी पार्टीचे अध्यक्ष मुलायम सिंह यादव, पीएसपीचे प्रमुखे शिवपाल सिंह यादव आणि सपाचे प्रमुख अखिलेश यादव इटावा विजय यात्रामध्ये एकत्र पोहोचले होते. यादरम्यान जो एक फोटो व्हायरल होत होता, त्याने प्रत्येकाला निशब्द केले. पुत्र अखिलेश यादव यांना निवडणूक जिंकू देण्यासाठी मुलायम सिंह पहिल्यांदा इटावामधील रोड शोमध्ये उपस्थित राहिले होते.


हेही वाचा – Uttarakhand Election 2022 : मतदानाच्या कमी टक्क्यांचा फायदा नेमका कोणाला? राज्यात कोणाची येणार सत्ता?


Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -