महाराष्ट्रात 24 तासांत कोरोनाचे 319 नवे रुग्ण, XBB व्हेरियंट रुग्णांच्या संख्येत वाढ

महाराष्ट्रात मागील 24 तासांत 319 इतक्या नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच राज्यात आतापर्यंत XBB व्हेरियंट रुग्णांच्या संख्येत वाढ झाली असून 36 रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये सर्वाधिक रुग्ण हे पुण्यातील आहेत. तर ठाण्यात 10 रुग्ण आढळून आले आहेत.

राज्यात आतापर्यंत एकूण 79,81,541 रुग्ण कोरोना मुक्त होऊन घरी परतले आहेत. तसेच 24 तासांत 406 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. रूग्ण बरे होण्याचं प्रमाण हे 98.16 टक्के इतकं झालं आहे. राज्यातील मृत्यूदर हा 1.82 टक्के इतका आहे. राज्यात आतापर्यंत कोरोनाची एकूण रुग्णसंख्या ही 81,31,458 इतकी झाली आहे.

देशात गेल्या 24 तासांत 1 हजार 574 नवीन कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. देशातील कोरोना पॉझिटिव्हिटी रेट 0.95 टक्के आहे. तर काल शुक्रवारी 2 हजार 208 नवीन कोरोना रुग्ण आढळले होते. तर 12 जणांचा मृत्यू झाला होता.


हेही वाचा : ऐकावं ते नवलच! हिवाळी अधिवेशनाचा खर्च 100 कोटींच्या घरात जाण्याची