घरदेश-विदेशआता विजय माल्ल्याच्या हेलिकॉप्टरचा होणार लिलाव

आता विजय माल्ल्याच्या हेलिकॉप्टरचा होणार लिलाव

Subscribe

विजय माल्ल्याच्या हेलिकॉप्टरचा देखील आता लिलाव करण्यात येणार आहे. त्याची किंमत ही ८ कोटी रूपये आहे. ९ नोव्हेंबरला ऑनलाईन पद्धतीनं हा लिलाव करण्यात येणार आहे.

भारतीय बँकांचे ९ हजार कोटी रूपये बुडवून परदेशी पळाले्ल्या विजय माल्ल्याच्या हेलिकॉप्टरचा देखील आता लिलाव करण्यात येणार आहे. आयकर विभागानं केलेल्या या कारवाईमुळं विजय माल्ल्याला आणखी एक दणका बसला आहे. या हेलिकॉप्टरची किंमत ही जवळपास ८ कोटी रूपये असणार आहे. मुख्य बाब म्हणजे ऑनलाईन पद्धतीनं ही विक्री होणार असून ९ नोव्हेंबरला विक्री प्रक्रियेला सुरूवात होणार आहे. ज्या इच्छुकांना हेलिकॉप्टरची खरेदी करायची असेल त्यांना ३ नोव्हेंबरपर्यंत जुहू विमानतळावर हेलिकॉप्टरची पाहणी करता येणार आहे. २००८मध्ये हेलिकॉप्टर्सची निर्मिती करण्यात येणार आहे. विक्री होणारं हेलिकॉप्टर हे एअरबस हेलिकॉप्टर्स एच१५५ बी १ या श्रेणीतील आहे. या हेलिकॉप्टरमध्ये ५ जणांना बसण्याची सोय आहे. त्यामुळे या हेलिकॉप्टरची खरेदी कोण करणार? याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.

वाचा – केंद्रीय मंत्री म्हणतात, ‘विजय माल्ल्यापासून काहीतरी शिका’!

विजय माल्ल्या आणि दणक्यांची मालिका

विजय माल्ल्या सध्या लंडनमध्ये राहत आहे. पण, त्याला आता लंडनमधून देखील बेघर होण्याची वेळ आली आहे. कारण विजय माल्ल्या राहत असलेली हवेली जप्त करण्यासाठी स्वीक बँकेनं देखील कोर्टात धाव घेतली आहे. तर, भारत देखील सध्या विजय माल्ल्याचं प्रत्यार्पण व्हावं यासाठी प्रयत्नशील आहे. त्यासाठी लंडन कोर्टात भारतानं आर्थर रोड कारागृहातील व्हिडीओ देखील सादर केला आहे. मागील वर्षी विजय माल्ल्याचं गोव्यातील घर देखील जप्त करण्यात आलं होतं. शिवाय, विजय माल्ल्याच्या अलिशान विमानाचा देखील लिलाव करण्यात येणार आहे. विजय माल्ल्यानं भारतीय बँकांचे ९ हजार कोटी बुडवल्यानंतर त्याच्या भारतातील संपत्ती जप्त करण्यात येत असून त्यांचा लिलाव करण्यात येत आहे. दरम्यान, आपण लंडनला जाण्यापूर्वी अर्थमंत्री अरूण जेटलींना भेटल्याचा दावा विजय माल्ल्यानं केला. त्यावरून भाजपच्या अडचणी देखील वाढल्या. काँग्रेसनं देखील भाजपवर चौफेर हल्ला केला होता.

वाचा – अरूण जेटलींमुळेच विजय माल्ल्या पळाला – राहुल गांधी

वाचा – कशी असेल विजय माल्ल्याची जेलमधील रूम?

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -