घरदीपोत्सवकथित राज्य उत्पादन शुल्क धोरण घोटाळाप्रकरणी दिल्ली, मुंबईसह तीस ठिकाणी ईडीचे छापे

कथित राज्य उत्पादन शुल्क धोरण घोटाळाप्रकरणी दिल्ली, मुंबईसह तीस ठिकाणी ईडीचे छापे

Subscribe

नवी दिल्ली – राज्य उत्पादन शुल्क धोरणप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने अनेक राज्यांत छापे टाकले आहेत. दिल्ली, उत्तर प्रदेश, हरियाणा, तेलंगण, महाराष्ट्रासह तीस ठिकाणी ईडीने छापे मारले आहेत.

दिल्लीच्या राज्य उत्पादन शुल्क धोरणप्रकरण सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. भारतीय जनता पक्षाने दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदीया यांच्यावर घोटाळ्याचा आरोप करण्यात आला आहे. यावरून सीबीआने मनीष सिसोदीया यांच्या घरी आणि बँक लोकरची चौकशी केली आहे. सीबीआयच्या एफआयआरमध्ये ज्यांची नावे नोंदवली गेली त्यांच्यावर आता ईडीकडून कारवाई केली आहे.

- Advertisement -

भाजपाने सोमवारी दिल्ली सरकारच्या कथित भ्रष्टाचारप्रकरणी एक स्टिंग ऑपरेशन केलं होतं, त्याचा व्हिडीओ जारी केला होता. या व्हिडीओमध्ये सनी मारवाहचे वडील कुलविंदर मारवाह दिसत आहे. हा व्यक्ती मनीष सिसोदिया यांना थेट पैसे पोहोचवतो, असा दावा भाजपा नेते संबित पात्रा यांनी केला आहे.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -