घरताज्या घडामोडीLok Sabha Election 2024 : यंदाच्या लोकसभेत देशात होणार कौटुंबिक लढती; वाचा...

Lok Sabha Election 2024 : यंदाच्या लोकसभेत देशात होणार कौटुंबिक लढती; वाचा सविस्तर

Subscribe

लोकसभा निवडणूक 2024 ला आता अवघे काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत. येत्या 19 एप्रिल रोजी लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील मतदानप्रक्रिया पार पडणार आहे. अशात यंदाची लोकसभा निवडणूक देशासाठी अत्यंत महत्त्वाची असणार आहे. कारण या लोकसभेच कौटुंबिक लढती पाहायला मिळणार आहे.

Lok Sabha Election 2024, मुंबई : लोकसभा निवडणूक 2024 ला आता अवघे काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत. येत्या 19 एप्रिल रोजी लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील मतदानप्रक्रिया पार पडणार आहे. अशात यंदाची लोकसभा निवडणूक देशासाठी अत्यंत महत्त्वाची असणार आहे. कारण या लोकसभेच कौटुंबिक लढती पाहायला मिळणार आहे. पश्चिम बंगालसह आंध्रप्रदेश, ओडिसा आणि महाराष्ट्रात या राज्यांत कौटुंबिक लढती होणार आहे. (Lok Sabha Election 2024 Family fights will be held in the country in this year Lok Sabha News)

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशाभरातील राजकीय पक्षांनी प्रचाराला सुरूवात केली आहे. अशातच पश्चिम बंगालसह आंध्रप्रदेश, ओडिसा आणि महाराष्ट्रात प्रचारादरम्यान कार्यकर्त्यांमध्ये गोंधळाचे वातावरण पाहायला मिळत आहे. कारण 2019 च्या लोकसभा निवडणुकीत ज्यांचा प्रचार केला. आता त्यांच्या विरोधात त्यांच्याच कुटुंबातील एक व्यक्ती लोकसभा निवडणूक लढवत आहे. त्यामुळे यंदाची लोकसभा निवडणूक देशासाठी महत्त्वाची असणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा – PM Narendra Modi : पंतप्रधान मोदींच्या हत्येचा कट? भाजपा नेत्याचे धक्कादायक विधान

महाराष्ट्रात नणंद-भावजय अशी लढाई

महाराष्ट्रातील कौटुंबिक लढाई पाहिल्यास, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ही लढाई होणार आहे. कारण राष्ट्रवादीत दोन गट पडल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे लोकसभेच्या बारामती मतदारसंघात पवार कुटुंबातील नणंद-भावजय यांच्यात लढाई होणार आहे. त्यामुळे या लोकसभा निवडणुकीत मतदार कोणाच्या बाजूने कौल देतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

- Advertisement -

पश्चिम बंगालमध्ये विभक्त दाम्पत्यांमध्ये लढाई

यंदाच्या लोकसभेत पश्चिम बंगलामध्येही कौटुंबिक लढाई पाहायला मिळणार आहे. पश्चिम बंगालमधील विष्णूपूर लोकसभा मतदारसंघातून विभक्त झालेले पत्नी-पत्नी एकमेकांविरोधात निवडणूक लढवणार आहेत. भाजपने खासदार सौमित्रा खान यांना पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. तसेच, तृणमूल काँग्रेसने त्यांची पूर्वाश्रमीची पत्नी सुजाता मंडल यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे विष्णूपूरच्या जागेवर कौंटुबिक सामना पाहायला मिळणार असून जनता कोणला विजयी करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

आंध्रप्रदेशात चुलत भाऊ-बहिणीत लढाई

आंध्रप्रदेशात ही कौटुंबिक लढाई पाहायला मिळणार आहे. आंध्रप्रदेशात जगनमोहन रेड्डी यांचा पक्ष आणि काँग्रेस पक्ष आमने सामने आले आहेत. जगनमोहन रेड्डी यांनी अविनाश रेड्डी यांना तिकिट दिले आहे. त्यांच्या विरोधात काँग्रेसकडून त्यांची बहीण निवडणूक लढवणार आहे.

ओडिशात सख्ख्या भावांमध्ये लढाई

एकाच कुटुंबातील सख्खे भाऊ लोकसभेच्या रिंगणात उतरले आहेत. ओडिशामध्ये लोकसभेबरोबरच विधानसभेच्या निवडणुकाही लागल्या आहेत. त्यासाठी राजकीय पक्षांनी उमेदवारांच्या घोषणाही केल्या आहेत. ओडिसातील चिकिटी विधानसभेच्या जागेवरुन दोन सख्ख्या भावांमध्ये सामना रंगणार आहे. काँग्रेसने रवींद्रनाथ सामंतराय यांना उमेदवारी दिली आहे. तर त्यांच्याविरोधात चिंतामणी सामंतराय निवडणूक लढवत आहेत.


हेही वाचा – Raj Thackeray : पंतप्रधान मोदींना पाठिंबा का? राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितले

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -