घरसंपादकीयवाणी संतांचीवाणी ज्ञानेश्वरांची

वाणी ज्ञानेश्वरांची

Subscribe

उत्तम अधमीं संचरती। ऐसे वर्णावर्ण मिसळती | तेथ समूळ उपडती / जातिधर्म //
उत्तम स्त्रिया अधम पुरुषाशी संगत करतात; त्यामुळे वर्णाचा परस्पर संकर होतो व सर्व जातीधर्म समूळ नाहीसे होतात.
जैसी चोहटाचिये बळी पाविजे सैरा काउळीं | तैसीं महापापें कुळीं | संचरती //
कावळे जसे चव्हाट्यावर ठेवलेल्या बळीवर चोहोकडून झडप घालतात, त्याप्रमाणे अशा कुलामध्ये महापातके संचार करू लागतात.
मग कुळा तया अशेखा | आणि कुळघातकां । येरयेरां नरका | जाणें आथी //
मग त्या कुळास आणि त्या कुळांचा नाश करणारे अशा दोघांनाही नरकप्राप्ती होते.
देखै वंशवृद्धि समस्त | यापरी होय पतित | मग वोवांडिती स्वर्गस्थ | पूर्वपुरुष //
(मग) हे पहा याप्रमाणे सर्व वंशाची वाढ थांबून त्यातील स्वर्गस्थ पूर्वज आपोआप पतन पावतात.
जेथ नित्यादि क्रिया ठाके | आणि नैमित्तिक क्रिया पारुखे । तेथ कवणा तिळोदकें। कवण अर्पी? //
ज्या कुलांत नित्य व नैमित्तिक कर्मे घडत नाहीत, त्या ठिकाणी पितरांना तिलोदक कोण अर्पण करणार?
तरी पितर काय करिती । कैसेनि स्वर्गीं वसती । म्हणौनि तेही येती । कुळापासीं //
अशी स्थिती झाल्यावर त्या पितरांनी काय करावे? व स्वर्गात कसे राहावे? म्हणून तेही आपल्या कुळापाशी येतात.
जैसा नखाग्रीं व्याळु लागे। तो शिखांत व्यापी वेगें | तेवीं आब्रह्म कुळ अवघें आप्लविजे //
ज्याप्रमाणे पायाच्या बोटाला साप चावला असता त्याचे विष मस्तकापर्यंत सर्वांग सत्वर पसरते, त्याप्रमाणे आप्तवर्गाचा वध करण्यापासून उत्पन्न होणारे पाप सत्य लोकांपर्यंत गेलेल्या सर्व पूर्वजांना पतीत करते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -