घरसंपादकीयवाणी संतांचीवाणी ज्ञानेश्वरांची

वाणी ज्ञानेश्वरांची

Subscribe

इये पुनरावृत्तीचीं घराणीं । आघवीं एकवटती जयाचिया प्रयाणीं । तो स्वरूपसिद्धीची कहाणी । कैसेनि आइके? ॥
हे सर्व जन्ममरणाच्या फेर्‍यात पाडणारे सर्व योग ज्याच्या मरणसमयी एके ठिकाणी येतात, त्यांच्या कानी मोक्षप्राप्तीची गोष्ट कोठून पडणार?
ऐसा जयाचा देह पडे । तया योगी म्हणौनि चंद्रवरी जाणें घडे । मग तेथूनि मागुता बहुडे । संसारा ये ॥
अशा वेळेवर ज्याचे देहावसान होते; त्याला, तो योगी असल्यामुळे चंद्रलोकापर्यंत जाता येते; मग तेथून माघारी फिरून जन्ममरणाच्या फेर्‍यात पडतो.
आम्हीं अकाळु जो पांडवा । म्हणितला तो हा जाणावा । आणि हाचि धूम्रमार्गु गांवा । पुनरावृत्तीचिया ॥
हे पांडवा आम्ही मरणास अयोग्य काळ म्हणून जो म्हटला, तो हाच असे समज. जन्ममरणाच्या गावास नेणारा द्यूम्र मार्ग हाच.
येर तो अर्चिरा मार्गु । तो वसता आणि असलगु । साविया स्वस्त चांगु । निवृत्तीवरी ॥
याच्याशिया व दुसरा जो अर्चिरा मार्ग तो भरवस्तीचा, सोपा, अति उत्तम व अगदी सुलभ असून मोक्षापर्यंत गेलेला आहे.
ऐशिया अनादिया दोन्ही वाटा । एकी उजू एकी अव्हांटा । म्हणौनि बुद्धिपूर्वक सुभटा । दाविलिया तुज ॥
एक सरळ आणि दुसरा वाकडा असे हे दोन मार्ग अनादि कालापासून चालत आलेले आहेत. म्हणून हे महावीरा, ते तुला बुद्धिपुरस्सर दाखविले.
कां जे मार्गामार्ग देखावे । साच लटिकें वोळखावें । हिताहित जाणावें । हिताचिलागीं ॥
का की, त्या मार्गापैकी चांगला कोणता व वाईट कोणता हे तुला दिसावे आणि खरेखोटे ओळखून, आपले हित साधून घेण्याकरिता (त्या) हित व अहित यांचाही विचार करावा.
पाहें पां नाव देखतां बरवी । कोणी आड घाली काय अथावीं । कां सुपंथ जाणोनिया अडवीं । रिगवत असे ॥
हे पहा, उत्तम अशी नाव पाहिल्यावरही खोल डोहात कोणी उडी टाकील काय? किंवा राजमार्ग टाकून आडमार्गाला जाईल काय?

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -