घरसंपादकीयवाणी संतांचीवाणी ज्ञानेश्वरांची

वाणी ज्ञानेश्वरांची

Subscribe

तुमचे या दिठिवेयाचिये वोले । सासिन्नले प्रसन्नतेचे मळे । ते साउली देखोनि लोळें । श्रांतु जी मी ॥
तुमच्या कृपादृष्टीच्या ओलाव्याने बहरलेल्या प्रसन्नतेच्या मळ्याची थंडगार सावली पाहून श्रमलेला असा जो मी तो त्या ठिकाणी विश्रांती घेतो.
प्रभू तुम्ही सुखामृताचे डोहो । म्हणौनि आम्ही आपुलिया स्वेच्छा वोलावो लाहों । येथही जरी सलगी करूं बिहों । तरी निवों कें पां ॥
महाराज, तुम्ही सुखामृताचे डोहच आहात, म्हणून आम्ही आपल्या इच्छेप्रमाणे त्यात बागडून थंडावा मिळवू, असे म्हणतो. तेथेही जर तसे करून घेण्यास तुमच्याशी सलगी करण्यास भिऊ लागलो, तर आम्ही तृप्त तरी व्हावे कोठे?
नातरी बालक बोबडां बोलीं । कां वांकुडा विचुका पाउलीं । तें चोज करूनि माउली । रिझे जेवीं ॥
किंवा बालकाच्या बोबड्या बोलांनी व वेड्यावाकड्या चालण्याने ज्याप्रमाणे कौतुक मानून आई आनंद पावते,
तेवीं तुम्हां संतांचा पढियावो । कैसेनि तरि आम्हांवरी हो । या बहुवा आळुकिया जी आहों । सलगी करीत ॥
त्याप्रमाणे तुम्हा संतजनांची प्रीती कोणत्या तरी रीतीने मजवर व्हावी, या पूर्ण उत्कट इच्छेने मी तुमच्याशी सलगी करीत आहे.
वांचूनि माझिये बोलतिये योग्यते । सर्वज्ञ भवादृश श्रोते । काय धड्यावरी सारस्वतें । पढों सिकिजे ॥
नाहीतर तुमच्यासारख्या सर्वज्ञ श्रोत्यास माझ्या बोलण्यापासून नवीन काही समजून घ्यावयाचे आहे काय? सरस्वतीपुत्राला धडे पाठ करून विद्या शिकावी लागते काय?
अवधारा आवडे तेसणा धुंधुरु । परि महातेजीं न मिरवे काय करूं । अमृताचिया ताटीं वोगरूं । ऐसी रससोय कैंची? ॥
पहा की, काजवा कितीही मोठा असला, तरी सूर्यप्रकाशापुढे त्याचे तेज पडेल काय? तसेच अमृतरूप ताटात वाढण्याजोगी पाकनिष्पती कोणती आहे?

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -