घरसंपादकीयवाणी संतांचीवाणी ज्ञानेश्वरांची

वाणी ज्ञानेश्वरांची

Subscribe

येथ संतोषोनि निवृत्तिदासें । जी जी म्हणौनि उल्हासें । अवधारा श्रीकृष्णा ऐसें । बोलते जाहले ॥
तेव्हा निवृत्तीदास ज्ञानदेव संतोष पावून मोठ्या उल्हासाने म्हणाले, होय महाराज, ऐका. श्रीकृष्ण असे म्हणाले,
नातरि अर्जुना हें बीज । पुढती सांगिजेल तुज । जें हें अंत:करणीचें गुज । जीवाचिये ॥
अर्जुना, माझ्या अंत:करणातील अति गुह्य असे जे ज्ञानाचे आदिकारण, ते तुला पुनः सांगतो.
येणें मानें जीवाचें हिये फोडावें । मग गुज कां पां मज सांगावें? । ऐसें कांहीं स्वभावें । कल्पिशी जरी ॥
आता अशा प्रकारे हे जीवीचे गुह्य फोडून ते तुला मी का सांगतो, अशी जर कदाचित तुझ्या मनात शंका येईल,
तरी परियेसी गा प्राज्ञा । तूं आस्थेचीच संज्ञा । बोलिलिये गोष्टीची अवज्ञा । नेणसी करूं ॥
तर, बाबारे, ऐक. तू समजदार असून केवळ आस्थेची मूर्ती आहेस आणि आम्ही तुला जे सांगतो, त्याची हेळसांड करीत नाहीस.
म्हणौनि गूढपण आपुलें मोडो । वरि न बोलणेंही बोलावें घडो । परि आमुचिये जीवींचें पडो । तुझ्या जीवीं ॥
म्हणून आमची गुह्य गोष्ट बाहेर पडली तरी पडो आणि न बोलावयाची गोष्ट बोलावी लागली तरी लागो, पण आमच्या हृदयातील गुह्य गोष्ट तुझ्या हृदयात पडो.
अगा थानीं कीर दूध गूढ । परि थानासीचि नव्हे कीं गोड । म्हणौनि सरो कां सेवितयाची चाड । जरी अनन्यु मिळे ॥
अरे, स्तनात जरी दूध साठविलेले असले तरी त्याची गोडी स्तनाला नसते, ते आपल्या स्तनातील दूध सरले तरी हरकत नाही, परंतु अनन्यभावाने सेवन करणार्‍या वत्साची मातेला इच्छा असते.
मुडांहूनि बीज काढिलें । मग निर्वाळलिये भूमीं पेरिलें । तरि तें सांडीविखुरीं गेलें । म्हणों ये कायी? ॥
मुढ्यातून बी काढून ते तयार केलेल्या जमिनीत पेरले, तर ते सांडलवंडीवारी गेले असे म्हणता येईल का?

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -