घरसंपादकीयवाणी संतांचीवाणी ज्ञानेश्वरांची

वाणी ज्ञानेश्वरांची

Subscribe

म्हणौनि ये निद्रेची वाट मोडे । निखिळ उद्बोधाचेंचि आपणपें घडे । ऐसें वर्म जें आहे फुडें । तें दावों आतां ॥
म्हणून या कल्पनारूप निद्रेचीच वाट मोडून शुद्ध बोधरूप आपणच आहोत अशा ज्ञानाचे जे एक वर्म आहे ते तुला आता पुढे सांगतो.
तरी धनुर्धरा धैर्या । निकें अवधान देईं बा धनंजया । पैं सर्व भूतांतें माया । करी हरी गा ॥
तर, हे धैर्यवान धनुर्धरा धनंजया, तू नीट लक्ष दे की, प्राणिमात्राची उत्पत्ती, स्थिती व लय यास एक मायाच कारण आहे.
जिये नांव गा प्रकृती । जे द्विविध सांगितली तुजप्रती । एकी अष्टधा भेदव्यक्ती । दुजी जीवरूपा ॥
त्या मायेला प्रकृती असे म्हणतात व ती दोन प्रकारची आहे म्हणून तुला पूर्वी सांगितलेच आहे. पैकी एक आठ प्रकारच्या रूपाने भिन्न आहे व दुसरी जीवरूप अशी आहे.
हा प्रकृतीविखो आघवा । तुवां मागां परिसिलासी पांडवा । म्हणौनि असो काई सांगावा । पुढतपुढती ॥
हे पांडवा, हा प्रकृतीचा सर्व विषय तू पूर्वी ऐकलाच आहेस, म्हणून त्याजबद्दल पुनः पुनः सांगण्याचे कारण नाही.
तरी ये माझिये प्रकृती । महाकल्पाच्या अंतीं । सर्व भूतें अव्यक्तीं । ऐक्यासि येती ॥
तरी महाकल्पाच्या शेवटी ही सर्व भूते माझ्या प्रकृतिरूप अव्यक्त स्वरूपात लय पावतात.
ग्रीष्माच्या अतिरसीं । सबीजें तृणें जैसीं । मागुती भूमीसी । सुलीनें होतिं ॥
ग्रीष्म ऋतूच्या शेवटी ज्याप्रमाणे गवत बीजासह पुन: जमिनीत जिरून जाते.
कां वार्षिये ढेंढें फिटे । जेव्हां शारदीयेचा अनुघडु फुटे । तेव्हां घनजात आटे । गगनींचें गगनीं ॥
किंवा पावसाळ्यातील ढगांचे अवडंबर संपल्यावर शरदऋतूचा अंकुर फुटतो, तेव्हा सर्व आकाशातीत ढग आकाशातच जिरून जातात.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -