घरताज्या घडामोडी26/11 Mumbai Attack: मुंबईतील दहशतवादी हल्ल्यावर आधारित ५ चित्रपट

26/11 Mumbai Attack: मुंबईतील दहशतवादी हल्ल्यावर आधारित ५ चित्रपट

Subscribe

२६/११ ची ही काळरात्र अनेक बॉलिवूड चित्रपटातून दाखवण्यात आली.

२६ नोव्हेंबर २००८, मुंबईसाठीची काळरात्र. समुद्रमार्गे मुंबईत शिरलेल्या १० दहशतवाद्यांनी मुंबईत गोळीबार करुन संपूर्ण मुंबई हादरवून टाकली. मुंबईतील महत्त्वाचे रेल्वे स्टेशन्स, हॉटेल्स,कॅफे,हॉस्पिटल अशा अनेक जागांवर बॉम्बस्फोट घडवले. दहशतवाद्यांनी अक्षरश: रक्ताची होळी केली. या हल्ल्यात पुटपाथवर राहणारे लोक देखील वाचले नाही. तब्बल तीन दिवसांनी मुंबईत सुरू असलेला हा रक्तरंजित खेळ संपला. तोपर्यंत या नरसंहारात एकूण १७४ लोकांचा मृत्यू आणि ३०० हून अधिक लोक जखमी झाले होते. मुंबईतील या थरारक घटनांच्या आठवणींनी आजही हात पाय कापतात. २६/११ ची ही काळरात्र अनेक बॉलिवूड चित्रपटातून दाखवण्यात आली. आज या हल्ल्याला १३ वर्ष पूर्ण झालीत. याच निमित्ताने २६/११ च्या हल्ल्यावर आधारित बॉलिवूडमधील ५ चित्रपट जाणून घेऊया.

द अटॅक ऑफ २६/११

- Advertisement -

मुंबईच्या दहशतवादी हल्ल्यावर आधारित ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर अभिनीत द अटॅक ऑफ २६/११ हा पहिला सिनेमा १ मार्च २०१३ साली प्रदर्शित करण्यात आला. नाना पाटेकरांनी या सिनेमात मुंबई पोलीस जॉइंट कमिशनरची भूमिका निभावली होती. संपूर्ण चित्रपटात दहशतवादी कसाबची चौकशी आणि हल्ल्याची संपूर्ण कहाणी उत्तम रित्या मांडण्यात आली. राम गोपाल वर्मा यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते.

हॉटेल मुंबई

- Advertisement -

२६/११ च्या हल्ल्यात दहशतवाद्यांनी प्रमुख लक्ष केलं होत ते म्हणजे हॉटेल ताज. ताज हॉटेलमध्ये जेव्हा हल्ला झाला तेव्हा तिथे अनेक विदेशी पर्यटक होते. हॉटेल मुंबई हा चित्रपट याच ताज हॉटेलवर आधारित आहे. हल्ल्यावेळी हॉटेलच्या स्टॉफने लोकांना कसं वाचवलं आणि या हल्ल्यादरम्यान हॉटेलमध्ये काय काय घडलं हे संपूर्ण या चित्रपटात दाखवण्यात आल आहे. २९ नोव्हेंबर २०१९मध्ये हा सिनेमा प्रदर्शित झाला होता.

ताज महल

ताज महल हा चित्रपट मुंबई हल्ल्यातील पोलीस,सुरक्षा रक्षक आणि ताज हॉटेलमधील कर्मचाऱ्यांवर आधारित चित्रपट आहे. या चित्रपटात २६/११ च्या हल्ल्यावेळी ताज हॉटेलच्या एका खोलीत एकट्या असलेल्या एका १८ वर्षांच्या फ्रांसीसी मुलीची कहाणी सांगण्यात आली आहे

 

फँटम

मुंबईत २६/११ हल्ल्यातील मास्टर माइंड हाफिज सईदची कहाणी चित्रपटातून दाखवण्यात आली. अभिनेता सैफ अली खान आणि अभिनेत्री कतरिना कैफ यांनी चित्रपटात काम केले आहे. मुंबई हल्ल्यावर लेखक हुसैन झैदी यांनी लिहिलेल्या ‘मुंबई एवेजर्स’ या पुस्तकारवर आधारित हा चित्रपट आहे. १८ ऑगस्ट २००५ साली हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. साजिद नाडियावाला आणि सिद्धार्थ रॉय कपूर यांनी चित्रपटाची निर्मिती केलीय तर काबीर खान याने सिनेमा दिग्दर्शन केले आहे.

 

वन लेस गॉड

२६/११ च्या घटनेवरील आणखी एक उत्तम चित्रपट म्हणजे वन लेस गॉड. वन लेस गॉड हा चित्रपट त्या रात्री मुंबई पोलीस आणि स्थानिक लोकांवर आधारित आहे. त्याचप्रमाणे दहशतवाद्यांचा निशाणा बनलेल्या विदेश पर्यटकांची कहाणी देखील चित्रपटात दाखवण्यात आली आहे. विदेशी पर्यटकांनी सुटकेची कथा चित्रपटात दाखवण्यात आली आहे. २०१७मध्ये हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला होता. चित्रपटात सुखराज दीपक,जोसेफ माल्हर,मिहिका राव आणि कबीर सिंह हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत.

 

स्टेट ऑफ सीज

स्टेट ऑफ सीज ही मुंबईत हल्लावर तयार करण्यात आलेली आठ एपिसोडची एक वेब सीरिज आहे. zee5 वर ही सीरिज पाहण्यासाठी उपलब्ध आहे. संपूर्ण सीरिज क्राइम थ्रिलर आहे. अडकलेल्या लोकांचे रेस्क्यू करणाऱ्या एनएसजी कमांडोवर ही सीरिज आधारित आहे. या वेब सीरिजमध्ये अर्जुन बाजवा,अर्जुन बिजलानी,मुकुल देव,विवेक दाहिया आणि तारा अलीश मुख्य भूमिकेत आहेत.

मुंबई डायरीज २६/११

मुंबई डायरीज २६/११ या सीरिजमध्ये२६/११ ची संपर्ण कहाणी दाखवण्यात आली आहे. मात्र सर्वात जास्त फोकस हा मेडिकल स्टाफ आणि त्या वेळी त्यांच्यावर आलेल्या परिस्थितीवर करण्यात आला आहे. मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये झालेल्या हल्ल्यावर ही सीरिज आधारित आहे. सीरिजमध्ये कोंकणा सेन शर्मा, मोहित रैना,टिना देसाई,श्रेया धन्वंतरी, सत्यजित दुबे, नताशा भारद्वाज,मृण्मयी देशपांडे आणि प्रकाश बेलावडी हे कलाकार आहेत.


हेही वाचा – हॅालीवूडपटांची मेजवानी आता मराठीत !

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -