सलमानला भेटण्यासाठी चाहत्याने सायकलवरून केलं 1100 किमी अंतर पार

बॉलिवूडचा सुपरस्टार अभिनेता सलमान खानचे करोडो चाहते आहेत. चाहते त्याची एक छलक पाहण्यासाठी नेहमीच आतुर असतात. नुकत्याच काही दिवसांपूर्वी सलमानने त्याचा 57 वा वाढदिवस साजरा केला. त्याच्या वाढदिवशी त्याचे अनेक चाहते त्याला शुभेच्छा देण्यासाठी त्याच्या बंगल्या बाहेर पोहोचले होते. यावेळी सलमानने त्यांना नाराज केलं नाही. चाहत्यांचे आभार मानन्यासाठी तो गॅलरीत आला. दरम्यान, सलमानच्या आणखी एका जबरदस्त चाहता त्याला पाहण्यासाठी सायकल वरुन तब्बल हजारो किमी अंतर पार करुन मुंबईला पोहोचला. या चाहत्याने जबलपुर पासून मुंबईपर्यंत 1100 किमी अंतर पार केलं आणि तो थेट सलमानच्या गॅलक्सी बंगल्याबाहेर पोहोचला.

चाहत्याचे स्वप्न झाले पूर्ण

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

सलमानच्या या चाहत्याचं नाव समीर असून तो लहानपणा पासूनच सलमानचा चाहता आहे. 22 डिसेंबरला तो त्याच्या जबलपुरच्या राहत्या घरापासून सायकलवरुन निघाला आणि 29 डिसेंबरला तो मुंबईमध्ये पोहोचला. सलमानला याबाबत कळताच तो गॅलक्सी बंगल्याबाहेर थांबलेल्या या चाहत्याला भेटला आणि त्याच्यासोबत अनेक फोटो देखील काढले. शिवाय फक्त फोटोच नाही तर त्या चाहत्याला सलमान त्याच्या बंगल्यात घेऊन गेला आणि जेवायला देखील दिलं आणि त्याची विचारपुस देखील केली.

‘या’ चित्रपटांमध्ये देखील दिसणार सलमान खान
सलमान खानचा बॉक्स ऑफिस रेकॉर्ड खूप जबरदस्त आहे. 300 कोटींच्या क्लबमधील 4 चित्रपट केवळ सलमानचे आहेत. मात्र, मागील काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेला अंतिम आणि राधे या चित्रपटाने फारशी कमाई केली नाही. आगामी काळात सलमान खान ‘किक 2’, ‘नो एंट्री 2’ आणि ‘टायगर 3’ मध्ये झळकणार आहे.


हेही वाचा :

सर्वांनी प्रार्थना करा… ऋषभ पंतसाठी उर्वशीच्या आईची सोशल मीडियावर पोस्ट