घरमनोरंजन‘गदर’चित्रपटाच्या निर्मात्यांची खास ऑफर; तिकिट असणार Buy 1 Get 1 Free

‘गदर’चित्रपटाच्या निर्मात्यांची खास ऑफर; तिकिट असणार Buy 1 Get 1 Free

Subscribe

2001 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘गदर’ चित्रपटाला त्या काळी प्रेक्षकांची चांगली पसंती मिळाली होती. त्यावेळी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जवळपास करोडोंची कमाई केली होती. अनिल शर्मा यांच्या या चित्रपटाचे यश पाहून यंदा या चित्रपटाचा दुसरा पार्ट ‘गदर 2’ देखील प्रदर्शित होणार आहे.या चित्रपटात अभिनेते सनी देओल आणि अमीषा पटेल मुख्य भूमिकेत असतील तसेच अभिनेता उत्कर्ष शर्मा त्यांच्या मुलाच्या भूमिकेत दिसणार असून अभिनेत्री सिमरत कौर सनी देओलच्या सूनेच्या भूमिकेत दिसेल.

लवकरच ‘गदर 2’चित्रपट प्रदर्शित होणार असून त्याआधी 9 जून रोजी 2001 मध्ये प्रदर्शित झालेला ‘गदर’पुन्हा एकदा चित्रपटगृहात प्रदर्शित केला जाणार आहे. अशातच आता प्रेक्षकांना निर्मात्यांनी एक ऑफर देखील दिली आहे.

प्रेक्षकांसाठी ‘गदर’चित्रपटाच्या निर्मात्यांची खास ऑफर

- Advertisement -

या चित्रपटाच्या निर्मात्यांनी असा निर्णय घेतलाय की, 9 जून रोजी प्रदर्शित होणाऱ्या‘गदर’चित्रपटाची तिकीटाची किंमत केवळ 150 रुपये असेल. शिवाय या एका तिकिटावर आणखी एक तिकिट मोफत असणार आहे. या चित्रपट मुंबई, दिल्ली आणि जयपूरच्या चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

‘गदर 2’ 11 ऑगस्टला रोजी होणार प्रदर्शित

अनिल शर्मा दिग्दर्शित ‘गदर: एक प्रेम कथा’मध्ये सनी देओल तारा सिंगच्या भूमिकेत दिसला होता . चित्रपटाची कथा तारा सिंग यांच्याभोवती फिरते. सनी देओल आणि अमिषा पटेल यांच्याशिवाय अमरीश पुरीही या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसले होते. ‘गदर’च्या 22 वर्षांनंतर आता ‘गदर 2’ येत आहे. या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये प्रचंड क्रेझ आहे. हा चित्रपट तयार करण्यासाठी जवळपास 100 कोटींचा खर्च करण्यात आला आहे. तर अभिनेता सनी देओलने चित्रपटासाठी 5 कोटी चार्ज केले आहेत. अमिषा पटेलने 2 कोटी चार्ज केले आहेत.

- Advertisement -

 


हेही वाचा :

गुरुद्वाराबाहेर सनी देओल आणि अमिषा पटेलने मारली एकमेकांना मिठी; SGPC ने केला निषेध

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -