घरमनोरंजनआमीर खानची मुलगी आयरा खान आणि नुपूर शिखरेचा थाटात झाला साखरपुडा

आमीर खानची मुलगी आयरा खान आणि नुपूर शिखरेचा थाटात झाला साखरपुडा

Subscribe

नुपूर शिखरे आणि आयरा यांची प्रेमकहाणी २०२० मध्ये सुरू झाली. दोघांनी व्हॅलेंटाईन वीकमध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या नात्याची घोषणा केली होती.

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणजेच अभिनेता आमिर खानची मुलगी आयरा खान ही नुपूर शिखरेला बऱ्याच दिवसांपासून डेट करत आहे. आयरा आणि नुपूरचे अनेक रोमँटिक फोटो सोशल मीडियावर सर्वानीच पहिले आहेत. पण आता या जोडीने त्यांच्या नात्यात एक पाऊल पुढे टाकले आहे. आयरा खानने तिचा प्रियकर नुपूर शिखरेसोबत साखपुडा केला आहे. त्याचे फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या दोघांच्या साखरपुड्याला कुटुंबातील काही ठराविक मंडळीच उपस्थित होती.

आयरा आणि नुपूरने त्यांचे कुटुंबीय आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत साखरपुडा केला त्याचेच फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. आयराने या खास दिवशी लाल रंगाचा ऑफ शोल्डर गाऊन घातला होता, ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. लाइट ज्वेलरी आणि हलका मेकअप असलेल्या या गाऊनमध्ये आयरा खूपच सुंदर दिसत होती. तर नुपूर शिखरे काळ्या रंगाच्या टक्सिडोमध्ये देखणा दिसत होता.

- Advertisement -

Trending news: Aamir Khan's daughter Ayra Khan got engaged, was seen  holding the hand of boyfriend Nupur Shikhare - Hindustan News Hub

आयरा खान आणि नुपूर शिखरे यांच्या एंगेजमेंटमध्ये आमिर खान पांढऱ्या कुर्ता पायजमामध्ये दिसला. यावेळी आमिर खानच्या दोन्ही आधीच्या पत्नी पोहोचल्या. आमिर खानची पहिली पत्नी रीना दत्ता पिवळ्या बॉर्डरसह क्रीम रंगाच्या साडीत दिसली. त्याचवेळी किरण रावही निळ्या रंगाची साडी परिधान करून एंगेजमेंटमध्ये पोहोचली होती. त्याचे फोटोही सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. याशिवाय आयरा खानचा भाऊ जुनैद खान, किरण रावचा मुलगा आझाद, चुलत बहीण झीनत हुसैन उस्थित होते तर अभिनेत्री फातिमा सना शेख हीसुद्धा या फंक्शनमध्ये दिसली.

- Advertisement -

किरण राव, आमिर खान, रीना दत्ता

दरम्यान नुपूर शिखरे अनेक स्टारकिड्सचे जिम ट्रेनर आहे आणि त्याने आमिर खानलाही ट्रेनिंग दिले आहे. नुपूर शिखरे आणि आयरा यांची प्रेमकहाणी 2020 मध्ये सुरू झाली. दोघांनी व्हॅलेंटाईन वीकमध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या नात्याची घोषणा केली होती. यानंतर, सप्टेंबर 2022 मध्ये नुपूरने तिच्या एका स्पर्धेनंतर आयराला प्रपोज केले.


हे ही वाचा – मन सुद्द तुजं, गोस्ट हाय प्रिथ्वीमोलाची!

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -