घरमनोरंजनसनी देओल कोरोना पॉझिटिव्ह

सनी देओल कोरोना पॉझिटिव्ह

Subscribe

हिमाचल प्रदेशचे आरोग्य सचिव अमिताभ अवस्थी यांनी मंगळवारी रात्री उशीरा याबाबत माहिती दिली.

बॉलिवूड अभिनेता आणि गुरदासपूरचे भाजप खासदार सनी देओल यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे, अशी माहिती हिमाचल प्रदेशचे आरोग्य सचिव अमिताभ अवस्थी यांनी मंगळवारी रात्री उशीरा दिली. तर सनी देओल गेल्या काही महिन्यांपासून कुल्लू येथे वास्तव्यास होते, असे त्यांनी सांगितले.

आरोग्य सचिव अमिताभ अवस्थी यांनी दिलेल्या माहितीनुसार, “कुल्लूच्या मुख्य आरोग्य अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार सनी देओल आणि त्याचे मित्र मुंबईकडे रवाना होण्याची तयारी करत होते. परंतु त्यादरम्यान मंगळवारी सनी देओल यांना कोरोनाची लागण झाली,”

- Advertisement -

दरम्यान, पीटीआयच्या वृत्तानुसार ६४ वर्षीय अभिनेता सनी देओलची नुकतीच मुंबईमध्ये खांद्याची सर्जरी झाली आहे. त्यानंतर काही दिवस आराम करण्यासाठी ते मनालीमधील आपल्या फार्म हाऊसवर गेले होते. मागील काही दिवसांपासून ते तिथेच थांबून कुल्लूतील फार्म हाऊसमध्ये उपचार घेत होते. माहितीनुसार, ३  डिसेंबर रोजी सनी देओल मनालीवरुन मुंबईला परत जाणार होते. मुंबई जाण्याआधी त्यांनी आपली कोरोना टेस्ट केली. त्यात त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.


सर्व देशवासीयांना लस देऊ असं सरकारने कधीही म्हटलं नाही – आरोग्य सचिव

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -