घरमनोरंजनअभिनेता स्वप्नील जोशीच्या घरातील बाप्पाची मूर्ती आहे खास; काय आहे वैशिष्ट्य ?

अभिनेता स्वप्नील जोशीच्या घरातील बाप्पाची मूर्ती आहे खास; काय आहे वैशिष्ट्य ?

Subscribe

अभिनेता स्वप्नील जोशीच्या घरची बाप्पाची गणेशाची मूर्ती(ganesh moort) खूप खास आहे. नेमकं काय वैशिट्य आहे या मूर्तीचं?

आज गणेश चतुर्थीचा(ganesh chaturthi) आनंद सर्वत्र दिसतो आहे. गणेशोत्सवाला(ganeshotsav) आजपासून प्रारंभ झाला झाल्याने सगळीकडेच भक्तिमय वातावरण आहे. सर्वांच्याच घरी आज गणपती बाप्पा विराजमान झाले आहेत. अशातच अभिनेता स्वप्नील जोशी(actor swapnil joshi) याच्याही घरी दरवषी प्रमाणे यंदाही गणपती बाप्पाचं आगमन झालं आहे. स्वप्नीलच्या घराचा बाप्पा दीड दिवसच असतो. बाप्पाच्या मूर्तीकडे पाहिलं की नेहमीच प्रसन्न वाटतं. अभिनेता स्वप्नील जोशीच्या घरची बाप्पाची गणेशाची मूर्ती(ganesh moort) खूप खास आहे. नेमकं काय वैशिट्य आहे या मूर्तीचं?

हे ही वाचा – मराठी कलाकारच एकमेकांचा अपमान करतात… अशोक मामांच्या अपमानावरून नेटकऱ्यांची स्वप्नील जोशीवर टीका

- Advertisement -

गणपती बाप्पा मोरया, मंगलमुर्ती मोरया म्हणत स्वप्नील जोशीने(swapnil joshi) त्याच्या घरी गणपतीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना केली. त्याच्या घरी गणपतीची ही एकच मूर्ती दरवर्षी विराजमान होते. पर्यावरणाचा विचार करून स्वप्नील जोशीने ही गणपतीची मूर्ती विशेषत्वाने घडवून घेतली आहे. स्वप्नील जोशीच्या घरी असेलेली ही मूर्ती पंचधातूपासून बनवली आहे. प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीच विसर्जन केल्याने तलाव, नदी आणि समुद्रातील पाण्याचे होणारे प्रदूषण हा चिंतेचा विषय आहे आणि म्हणूनच स्वप्नील आणि त्याच्या कुटुंबीयांनी पंचधातूची गणेश मूर्ती आणून तिची प्राणप्रतिष्ठापना करण्याचा निर्णय घेतला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rajshri Marathi (@rajshrimarathi)

- Advertisement -

हे हि वाचा – फिट राहण्यासाठी स्वप्नील जोशी शिकतोय Animal Flow Workout, काय आहेत याचे फायदे?

गणपती बाप्पाची मनोभावे पूजा करताना स्वप्नीलने पर्यावरणाची सुद्धा काळजी घेतली आहे. घरच्या बाप्पाची पूजा करतानाचा एक व्हिडीओ सुद्धा (swapnil joshi and family) इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर केला आहे. त्यात स्वप्नील जोशी त्याच्या कुटुंबासोबत गणपतीची प्रार्थाना करताना दिसत आहे

हे ही वाचा – यंदाचा गणेशोत्सव करा संगीतमय; आवर्जून ऐका ‘या’ गणेशस्तुती

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -