घरताज्या घडामोडीDia Mirza: बाळंतपण म्हणजे मृत्यूशी झुंज! दियाने शेअर केला अनुभव

Dia Mirza: बाळंतपण म्हणजे मृत्यूशी झुंज! दियाने शेअर केला अनुभव

Subscribe

सोशल मीडियावर एक भावूक पोस्ट शेअर करत मुलाच्या जन्मानंतर दोन महिन्यांनी दियाने ही गुड न्यूज सांगितली होती. दियाने म्हटले होते, माझ्या मुलाच्या जन्म वेळेच्या आधी झाला. तेव्हा पासून माझ्या मुलाची नर्स आणि डॉक्टर्स आयसीयूमध्ये काळजी घेत होते.

अभिनेत्री दिया मिर्झा तिच्या प्रेग्नंसीमुळे प्रचंड चर्चेत आली होती. २०२०मध्ये दियाने अव्यान या तिच्या मुलाला जन्म दिला. आई बनणं हा दियासाठी वेगळा आणि सुंदर अनुभव होता. आई बनणे जितके सुंदर आहे तितकाच वाईट अनुभव दियाने तिच्या बाळंतपणात घेतला आहे. दियाने बाळंतपणात मृत्यूशी झूंज दिली. तिचे बाळ देखील जाण्याचे चान्सेस होते मात्र सुदैवाने दोघेही सुखरुप आले. दियाने तिच्या बाळंतपणाचा कटू अनुभव शेअर करत तिच्या डॉक्टरांचे आभार मानलेत.

टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत दियाने तिच्या बाळंतपणाचा अनुभव सांगितला. दिया म्हणाली, पाचव्या महिन्यात अपेन्डेक्टोमी म्हणजेच अपेंडिक्स काढून टाकणारी सर्जरी करावी लागली. त्या सर्जरीनंतर एक्यूट बॅक्टेरियल इंफेक्शमुळे मला अनेक वेळा रुग्णालयात जावे लागत होते. हा काळ माझ्यासाठी फार कठीण होता असे दिया म्हणाली.

- Advertisement -

दियाच्या बाळाचा जन्म हा चार महिने आधीच झाला. मला लवकर बाळंतपण करावे लागले कारण माझ्या प्लेसेंटातून रक्तस्राव सुरू झाला होता. बाळाचा जन्मात यामुळे अनेक अडचणी येणार होत्या. त्यामुळे माझे गायनाकोलॉजिस्ट देखील टेंशनमध्ये आल्या होत्या. मात्र त्यांच्यामुळेच आम्ही दोघेही बचावलो असे म्हणत दियाने तिच्या डॉक्टरांचे आभार मानले.

दियाने बाळाला जन्म दिला तेव्हा कोरोनाचा काळ सुरू होता. कोरोना काळात आई होण्याचा अनुभव देखील दियाने यावेळी शेअर केला. दिया म्हणाली, कोरोना महामारीत एका नव्या जीवाला या जगात आणणे ही फार मोठी जबाबदारी होती. या काळात आम्ही सगळे घरी होतो. एकमेकांसोबत आम्ही फार आनंदात राहत होतो. आमचा वेळ आमच्या मुलांसोबत फार आनंदात जात होता. आम्ही आनंदी आणि सुरक्षित होतो.

- Advertisement -

दियाने जुलै २०२१मध्ये आई झाल्याची बातमी सर्वांनी दिली. सोशल मीडियावर एक भावूक पोस्ट शेअर करत मुलाच्या जन्मानंतर दोन महिन्यांनी दियाने ही गुड न्यूज सांगितली होती. दियाने म्हटले होते, माझ्या मुलाच्या जन्म वेळेच्या आधी झाला. तेव्हा पासून माझ्या मुलाची नर्स आणि डॉक्टर्स आयसीयूमध्ये काळजी घेत होते. माझ्या बाळंतपणात मला अचानक एपेंडेक्टोमी सुरू झाले. त्यानंतर बॅक्टेरिअल इंफेक्शन झाले. यामुळे आमच्या दोघांच्या जीवाला धोका निर्माण झाला असता मात्र आम्ही दोघेही आता ठिक आहोत असे दियाने म्हटले होते.


हेही वाचा – वाढत्या वजनामुळे आमिरची लेक ईरा चिंतेत; 15 दिवस उपवास करत वजन घटवण्याचा प्रयत्न

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -