पान मसाल्याची जाहिरात आयुष्यातील सर्वात मोठी चूक…; अक्षय कुमारने व्यक्त केली खदखद

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार सतत विविध कारणांमुळे चर्चेत असतो. अनेकदा त्याच्या चित्रपटांमुळे तसेच जाहिरातींमुळे त्याला नेटकऱ्यांच्या टीकेचा सामना करावा लागतो. काही दिवसांपूर्वी एका अमेरिकन कंपनीच्या जाहिरातीमध्ये अक्षयने भारताच्या नकाशावर पाय दिल्याने ट्रोल झाला होता. या जाहिरातीआधी एका पान मसाल्याच्या जाहिरातीत काम केल्याने देखील अक्षय ट्रोल झाला होता. अशातच एका वृत्तवाहिनीसोबत बोलताना अक्षयने याबाबत आपलं मत व्यक्त केलंय.

एका वृत्तवाहिनीसोबत बोलताना अक्षय कुमारला विचारण्यात आलं की, “तुझ्या आयुष्यात तू अशी कोणती चूक केली आहे ज्यानंतर तुला चूकीचा पश्चाताप झाला आणि तू ती चूक स्वीकारली आहेस?” त्यावर उत्तर देताना अक्षय कुमार
म्हणाला की, पान मसाला कंपनीसाठी केलीली जाहिरात आयुष्यातील मोठी चूकी होती.

पान मसाल्याच्या जाहिरातीत काम करणं मोठी चूक

अक्षय कुमार म्हणाला की, “आयुष्यात मी अनेक चूका केल्या त्यातील एक मोठी चूक म्हणजे पान मसाल्याची जाहिरात. त्या चूकीचा मला खूप पश्चाताप झाला. मी त्या चूकीचा स्वीकार केला. प्रत्येक व्यक्ती चूकीमधून काहीतरी शिकतो. मी देखील शिकलो.” असं अक्षय म्हणाला.

ट्वीट शेअर करत मागितली होती माफी

गेल्या वर्षी या जाहिरातीमुळे अक्षयला नेटकऱ्यांच्या ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. त्यावेळी ट्वीट शेअर करत अक्षयने माफी देखील मागितली होती.

 


हेही वाचा :

‘RRR’ चित्रटाचा हॉलिवूडमध्ये डंका; हॉलिवूड क्रिटिक्स 2023 मध्ये पटकावले पुरस्कार