Video: सलमान नंतर ‘या’ सिंगरला सापाने केला दंश

'बिच डोन्ट बी मॅड' या गाण्याची गायिका माएताला सापाने दंश केला

बॉलिवूडचा भाईजान सलमान खानला रविवारी सापाने दंश केला. पनवेलच्या फार्महाऊसवर सलमानसोबत हा भयंकर प्रकार घडला. सुदैवाने साप बिनविषारी असल्याने सलमानला काहीही झाले नाही. सलमाननंतर पुन्हा एका सिंगरला देखील सापाने दंश केला आहे. ‘बिच डोन्ट बी मॅड’ या गाण्याची गायिका माएताला सापाने दंश केला आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. माएता एका गाण्याचे शुटींग करत असताना सापाने तिला दंश केला आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये २१ वर्षीय गायिका माएता जमीनवर झोपली आहे. अचानक साप तिच्या चेहऱ्याला दंश करतो. ५ सेंकदाचा व्हिडिओ काही क्षणांसाठी सर्वांना थक्क करणारा आहे.

सलमान खानला पनवेलच्या फार्म हाऊसवर सर्पदंश ; बिनविषारी सापामुळे अनर्थ टळला

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये गायिका माएता ब्लॅक कलरचा ड्रेस घालून जमिनीवर झोपली आहे. तिच्या अंगावर २-३ साप ठेवलेले आहेत. ती हसू लागते तिच्या सोबत असलेला माणूस एक व्हाइट कलरचा साप तिच्या अंगावर ठेवतो तेवढ्यात काळ्या कलरचा साप उडी मारतो आणि गायिकेच्या हनुवटीला दंश करतो. या सगळ्या प्रकार कॅमेरात कैद करण्यात आला आहे. २० डिसेंबरला हा व्हिडिओ गायिका माएताने ‘पुन्हा कधीच नाही’ असे म्हणत ट्विटरवर शेअर केला. इन्स्टाग्रामवर या व्हिडिओला आतापर्यंत ४४२ हजाराहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

 

हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी व्हिडिओवर अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘माणसे आपला जीव धोक्यात का घालतात?’ ‘जगात संकट ओढावून घेणाऱ्यांची कमी नाही’, अशा अनेक कमेंट नेटकरी करत आहेत. गायिका माएथाला दंश केलेला साप हा बिनविषारी असल्याचे तिचा जीव थोडक्यात वाचला. गाण्याच्या शुटींगसाठी काही बिनविषारी साप आणण्यात आले होते. त्यातील एका बिनविषारी सापाने माएताच्या चेहऱ्यावर दंश केला.


हेही वाचा – सलमान खानला ३ वेळा सर्पदंश; ‘Birthday’ च्या दिवशीच सांगितले किस्से