घरमनोरंजन...म्हणून ऐश्वर्याने करण जोहरचा 'कुछ कुछ होता है' चित्रपटाची धुडकावली होती ऑफर

…म्हणून ऐश्वर्याने करण जोहरचा ‘कुछ कुछ होता है’ चित्रपटाची धुडकावली होती ऑफर

Subscribe

त्यावेळी टिना ही भूमिका राणी मुखर्जीने केली.

बॉलिवूडमध्ये १९ च्या दशकात सुपर हिट ठरलेल्या चित्रपटांचा चाहता वर्ग आज मोठा आहे. या चित्रपटांच्या यादीतील कुछ कुछ होता है चित्रपटही सर्वाधिक लोकप्रिय ठरला. १९९८  मध्ये  प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात अभिनेता शाहरुख खान आणि अभिनेत्री राणी मुखर्जीची मुख्य भूमिकेत होते. तर करण जोहरने या चित्रपटातून सिनेसृष्टीमध्ये दिग्दर्शक म्हणून पदार्पण केले. विशेष म्हणजे करणच्या या पहिल्याच चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान गल्ला जमवला.

कुछ कुछ होता है चित्रपटातील मुख्य भूमिकेसाठी करणने अनेक कलाकारांना संपर्क केला. तर टिना या मुख्य भूमिकेसाठी सर्वात सुंदर अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनला विचारले होते, पण त्यावेळी ऐश्वर्याने ही भूमिका करण्यास नकार दिला. त्यावेळी टिना ही भूमिका राणी मुखर्जीने केली. या चित्रपटाने रातोरात राणी मुखर्जी लोकप्रियतेच्या शिखरावर पोहचली. परंतु टीना या पात्रासाठी करनची पहिली पसंती ऐश्वर्यालाच होती. आजही या चित्रपटातील गाणी, डायलॉग चाहत्यांच्या बोलण्यातून समोर येत असतात. तसेच सोशल मीडियावरही यातील गाण्यांना चाहते तुफान प्रतिसाद देतात.

- Advertisement -

मात्र ऐश्वर्याने या भूमिकेसाठी का नका दिला होता याबाबताचा खुलासा तिने एका मुलाखतीत दिला. कुछ कुछ होता है हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर जवळपास एका वर्षानंतर ऐश्वर्याने या चित्रपटाची ऑफर तिला मिळाली होती पण ती नाकराली असे तिने सांगितले होते. कारण त्यावेळी बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये ऐश्वर्याने नुकतीच एंट्री घेतली होती. तिने फक्त तिन चित्रपटांमध्ये काम केले होते. त्यामुळे कोणता चित्रपट करावा किंवा करु नये याबाबत ती पार गोंधळून गेली होती. त्यामुळे तिने हा चित्रपट करण्यास नकार दिला असे म्हटले आहे.


१२ वर्षे गप्प होतो परंतु आता बसणार नाही, राज कुंद्राने पहिल्या  पत्नीबाबत केला खळबळजनक खुलासा


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -