घरमनोरंजनभारताच्या दमदार विजयानंतर अनुष्काची विराटसाठी खास पोस्ट; म्हणाली...

भारताच्या दमदार विजयानंतर अनुष्काची विराटसाठी खास पोस्ट; म्हणाली…

Subscribe

विराटच्या या दमदार खेळीने सर्वत्र त्याचे आणि संघाचे कौतुक होत आहे. विराटची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मा हिने सुद्धा इंस्टाग्रामवर फोटो बरोबर एक खास पोस्ट शेअर केली आहे. त्याला छान असे कॅप्शन सुद्धा तिने दिले आहे.

आज 23 ऑक्टोबर रोजी टी-20 विश्वचषकातील सर्वात लक्षवेधी असलेला भारत विरुद्ध पाकिस्तानचा सामना रंगला या सामन्यात भारताने पाकिस्तानचा चार गडी राखून पराभव केला आणि टी – 20 वर्ल्डकपची दमदार सुरूवात केली. भारताच्या या ‘विराट’ विजयामुले टिम इंडियाने देशवासियांना मोठं गोफात दिलं. संपूर्ण भारतात फटाक्यांची आतषबाजी करत सर्वांनी भारताचा विजय साजरा केला. ऑस्ट्रेलियातील मेलबर्नमध्ये हा सामना रंगला होता.भारताचा माजी कर्णधार विराट कोहली याने 53 चेंडूत 82 धावा केल्या. विराटच्या या दमदार खेळीने सर्वत्र त्याचे आणि संघाचे कौतुक होत आहे. विराटची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मा हिने सुद्धा इंस्टाग्रामवर फोटो बरोबर एक खास पोस्ट शेअर केली आहे. त्याला छान असे कॅप्शन सुद्धा तिने दिले आहे.

अनुष्का पोस्ट मध्ये काय म्हणाली?

- Advertisement -

फारच सुंदर, अति सुंदर…. दिवाळीच्या पूर्वसंध्येला तुम्ही सर्वांनी देशवासीयांच्या आयुष्यात आनंद आणलात.

तू फारच अद्भुत आहेस. तुझी जिद्द, धमक आणि आत्मविश्वास मनाला खरच भावून टाकणारा आहे. मी आतापर्यंतच्या माझ्या आयुष्यातील सर्वोत्कृष्ट सामना आज पाहिला. मी तुझा खेळ पाहून नाचत होते, ओरडत होते…. पण आपली आई असं का करते हे आपली मुलगी पाहात होती. तिला हे समजण्यासाठी ती अजून खूप लहान आहे. पण एक दिवस तिला हे नक्कीच समजेल. तिच्या वडिलांनी त्या रात्री सर्वोत्तम खेळी खेळली होती. त्याच्यासाठी तो टप्पा फार कठीण होता. पण आता तो पूर्वीपेक्षा अधिक मजबूत आणि हुशार झाला आहे.

- Advertisement -

मला तुझा खूप अभिमान आहे. माझे तुझ्यावरील प्रेम असेच कायम अमर्यादित असेल. लव्ह यू, अशी पोस्ट अनुष्काने विराटसाठी केली.

 

View this post on Instagram

 

A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma)

दरम्यान, विराट कोहलीने फटकेबाजी सुरू करत 19 वे षटक टाकणाऱ्या हारिस रौऊफला सलग दोन षटकार मारत सामना 6 चेंडूत 16 धावा असा आणला. मात्र हार्दिक पांड्या पहिल्याच चेंडूवर झेलबाद झाला. तो 36 चेंडूत 40 धावा करून माघारी परतला. त्यानंतर कार्तिकने 1 तर विराटने 2 धावा करून सामना 3 चेंडूत 13 धावा असा आणला. मात्र नवाझने नो बॉल टाकत भारताला विजयाची संधी निर्माण करून दिली.

विराटने नो बॉलवर षटकार मारत सामना 3 चेंडूत 6 धावा असा आणला. पुढचा चेंडू नवाझने वाईड टाकला त्यामुळे सामना 3 चेंडूत 5 धावा असा होता. त्यानंतर पुढच्या चेंडूत नवाझने विराटला बोल्ड केले मात्र नो बॉल असल्याने सामना 2 चेंडूत 2 धावा असा आणला. स्ट्राईकवर असलेल्या दिनेश कार्तिक स्टम्पिंग आऊट झाला. भारताला आता 1 चेंडू आणि 2 धावांची गरज होती. नवाजने वाईड टाकत सामना भारताच्या खिशात टाकला. विजयासाठी 1 धावेची गरज असताना अश्विनने चौकार मारत विजय साकारला.

भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करत पाकिस्तानला 159 धावात रोखले. भारताकडून अर्शदीप सिंग आणि हार्दिक पांड्याने प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या. मोहम्मद शमी आणि भुवनेश्वर कुमारने प्रत्येकी 1 विकेट घेत या दोघांना चांगली साथ दिली. पाकिस्तानकडून शान मसूद (52) आणि इफ्तिकार अहमदने (51) अर्धशतकी खेळी केली.


हे ही वाचा – भारत-पाकिस्तान सामन्यानंतर हार्दिक पांड्या ढसाढसा रडला, म्हणाला…

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -