Happy Birthday Amitabh Bachchan: म्हणूनच बिग बींनी पान मसाला जाहिरात सोडली अन् पैसेही दिले परत

amitabh bachchan birthday big b cancels contract with pan masala brand
Happy Birthday Amitabh Bachchan: म्हणूनच बिग बींनी पान मसाला जाहिरात सोडली अन् पैसेही दिले परत

बॉलिवूडमधील महानायक अमिताभ बच्चन आज ७९व्या वाढदिवस साजरा करत आहेत. त्यामुळे सध्या सोशल मीडियावरून चाहते त्यांना शुभेच्छा देताना दिसत आहेत. काही काळापूर्वी अमिताभ बच्चन एक पान मसालाची ॲड करत होते. यामुळे ते सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल झाले होते आणि त्यांना या ॲडमुळे खूपच टार्गेट केले होते. यावर बिग बींनी काहीच प्रतिक्रिया दिली नाही. पण याप्रकरणाबाबत आता अमिताभ बच्चन यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यांनी या ॲडमधून आपले नाव परत घेतले आहे. या ॲडमुळे नव्या पिढीला पान मसाला सेवन करण्यासाठी प्रोत्साहन मिळू नये, यासाठी बिग बींनी ही ॲड सोडली आहे. या ॲडसाठी मिळालेले त्यांनी पैसे परत देखील केले आहेत.

अमिताभ बच्चन यांनी कमला पसंदची ॲड केली होती. ज्यानंतर लोकांनी त्यांच्यावर आपेक्ष घेतला होता. देशातील सिनिअर मोस्ट पर्सनॅलिटी असल्यामुळे अमिताभ बच्चन यांनी अशी ॲड केली नाही पाहिजे, असे लोकांचे मत होते. तसेच नॅशनल अँटी-टोबॅको ऑर्गेनाईजेशनने बच्चन यांनी ही ॲड सोडण्यासाठी विनंती केली होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Amitabh Bachchan (@amitabhbachchan)

पण हे सगळे पाहून आता बच्चन यांनी अधिकृत स्टेटमेंट जारी केले आहे. दरम्यान अमिताभ बच्चन यांच्या चाहत्याने पान मसाला ॲडवर प्रश्न केला होता. त्यांचे उत्तर देताना बच्चन म्हणाले की, ‘जर कोणत्या संस्थेला याचा फायदा होत आहे, तर आपण हे काय करत आहोत? असा विचार केला नाही पाहिजे. जशी आपली इंडस्ट्री चालते तशी त्यांचीही इंडस्ट्री चालते. तुम्हाला असे वाटते की, हे मी केले नाही पाहिजे. पण यासााठी मला पैसे मिळाले आहेत.’ मात्र आता अमिताभ बच्चन यांनी या ॲडमधून आपले नाव परत घेतले आहे.


हेही वाचा – जॅकी भगनानीला डेट करतेय रकुलप्रीत सिंग; म्हणाली, ‘आयुष्यातलं सर्वात मोठं गिफ्ट’