घरमनोरंजनसुशांतच्या आठवणींना उजाळा देत अंकिताने शेअर केला 'पवित्र रिश्ता 2.0' मालिकेचा ट्रेलर

सुशांतच्या आठवणींना उजाळा देत अंकिताने शेअर केला ‘पवित्र रिश्ता 2.0’ मालिकेचा ट्रेलर

Subscribe

सुशांतने नेहमी मला प्रोत्साहन दिले आहे. पवित्र रिश्ताने आम्हा दोघांना घडवले आहे. सुशांत आज असता तर आज प्रचंड खूश झाला असता.

छोट्या पडद्यावरील(Television) लोकप्रिय मालिका ‘पवित्र रिश्ता’च्या(pravitra rishta) नवा सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या मालिकेचं शुटींगला सुरूवात झाली असून अभिनेत्री अंकिता लोखंडे(ankita lokhande) पुन्हा एकदा अर्चनाची(archana and manav) भूमिका साकारताना दिसणार आहे. तब्बल 12 वर्षानंतर अंकिता पिवत्र रिश्ता या मालीकेमधून छोट्या पडद्यावर पदार्पण करणार आहे. यामुळे अंकिता प्रचंड नर्वस असल्याचे दिसतेय. ही लोकप्रिय मालिका झी 5 (Zee 5)या ओटीटी प्लॅटफॉर्मवर देखील दाखवण्यात येणार असून लवकरच टेलिव्हिजनवर टेलीकास्ट करण्यात येणार आहे. तसेच या मालिकेत दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत याने साकरलेली मानवची भूमिका चाहत्यांच्या आजवर लक्षात आहे. मात्र यंदा अभिनेता शहीर शेख मानव ही प्रेक्षकांची लाडकी भूमिका कसा निभावतो याकडे सर्वाचे लक्ष लागून राहीले आहे.(ankita lohande share pavitra rishta trailer)

नुकतच पवित्र रिश्ता 2(pavitra rishta 2.0) मालिकेचं ट्रेलर लॉन्च करण्यात आले आहे. यादरम्यान अंकिता लोखंडे सुशांतच्या आठवणीत भावूक झालेली पाहायला मिळाली. अंकिता म्हणाली , ही मालिका माझ्यासाठी अत्यंत खास आहे. तसेच ही माझी पहिल-वहिली मालिका होती. 12 वर्षापूर्वी ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस आली होती मात्र आजही माझ्यामध्ये अर्चना जीवंत आहे. या भूमिकेमुळे या मालिकेमुळे मला ओळख मिळाली आहे. मी या भूमीकेशी नेहमी एकरुप राहणार आहे तसेच सुशांत आणि माझ्या चाहत्यांसाठी अर्चना आणि मानव कायम एक भावना आहेत.

- Advertisement -

तसेच अंकिता पुढे म्हणाली पवित्र रिश्ताचा नवा सिझन येतोय हे ऐकून सुशांत नक्कीच आनंदी झाला असात. सुशांतने नेहमी मला प्रोत्साहन दिले आहे. पवित्र रिश्ताने आम्हा दोघांना घडवले आहे. सुशांत आज असता तर आज प्रचंड खूश झाला असता.

पवित्र रिश्ता 2.0 चा ट्रेलर सध्या सोशल मीडियावर व्हारयरल होत असून व्हिडिओ पाहून चाहते देखील सुशांत सिंग राजपूतच्या आठवणीत भावूक झालेले पाहायला मिळाले

- Advertisement -

हे हि वाचा – siddharth shukla death: बिग बॉस फेम सिद्धार्थ शुक्लाचे निधन

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -