घरमनोरंजन'धर्मवीर'ची 10 दिवसांत तब्बल 18.03 कोटींची कमाई

‘धर्मवीर’ची 10 दिवसांत तब्बल 18.03 कोटींची कमाई

Subscribe

दिग्दर्शक प्रवीण तरडे आणि मंगेश देसाई यांची निर्मिती असलेला 'धर्मवीर मुक्काम पोष्ट ठाणे' (Dharmaveer mukkam post thane) हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर (Box Office) धुमाकूळ घालताना दिसत आहे.

दिग्दर्शक प्रवीण तरडे आणि मंगेश देसाई यांची निर्मिती असलेला ‘धर्मवीर मुक्काम पोष्ट ठाणे’ (Dharmaveer mukkam post thane) हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर (Box Office) धुमाकूळ घालताना दिसत आहे. या चित्रपटाची मागील दहा दिवसांची बॉक्स ऑफिसवरील कमाई समोर आली आहे. धर्मवीर चित्रपटाने 10 दिवसांत तब्बल 18.03 कोटींची कमाई केली आहे.

13 मे रोजी धर्मवीर प्रदर्शित झाला असून, प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी महाराष्ट्रातील सर्व सिनेमागृहात हाऊसफूलचा बोर्ड लागला होता. ठाण्यात शिवसेनेचं स्थान बळकट करणारे, कट्टर शिवसैनिक म्हणून ओळख निर्माण करणारे दिवंगत नेते धर्मवीर आनंद दिघे (Anand Dighe) यांचा जीवनप्रवास या चित्रपटात दाखवण्यात आला आहे.

- Advertisement -

‘धर्मवीर मुक्काम पोष्ट ठाणे’ या चित्रपटात अभिनेता प्रसाद ओकने (Prasad Oak) आनंद दिघे यांची भुमिका साकरली आहे. या भुमिकेसाठी बोलण्याची शैली, देहबोली तसेच काही विशिष्ट पद्धतीने अभ्यास केल्याचे प्रसाद ओकने सांगितले. हा चित्रपट पाहताच आनंद दिघे साहेब परत आल्याची भावना सर्वसामान्य जनतेच्या मनात निर्माण झाली आहे.

हेही वाचा – धर्मवीर चित्रपटाचा शेवट मुख्यमंत्र्यांनी टाळला, म्हणाले आनंद दिघेंचा मृत्यू…

- Advertisement -

दरम्यान, ‘धर्मवीर मुक्काम पोष्ट ठाणे’ हा चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर यशस्वी झाला होता. पहिल्याच आठवड्यात 13.87 कोटींची कमाई केली होती.

9.59 कोटींची कमाई

‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ हा सिनेमा 13 मे ला शुक्रवारी सिनेमागृहात प्रदर्शित झाला होता. पहिल्या दिवशी या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 2.5 कोटींची कमाई करत विक्रमी सुरुवात केली होती. त्यानंतर पुढील तीन दिवसांत या चित्रपटाने 9.59 कोटींची कमाई केली आहे.

हेही वाचा – धर्मवीर आनंद दिघेंनी मासुंदा तलाव का खोदला?

शेवटचा सीन सोशल मीडियावर व्हायरल

धर्मवीर चित्रपटातील शेवटचा सीन सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. यामध्ये राज ठाकरे आणि आनंद दिघे यांच्यामधील संवाद दाखवण्यात आला आहे. आनंद दिघे राज ठाकरेंना म्हणतात की, हिंदुत्वाची धुरा आता तुझ्याच खांद्यावर आहे. दरम्यान, या सीनचा फोटो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. आनंद दिघे आणि राज ठाकरे यांच्यामध्ये नेहमीच आपुलकीने आणि उत्तम पद्धतीने संवाद होत असे. त्यामुळेच चित्रपटातील हे दृश्य भावूक क्षणांची आठवण करून देणारे आहे.


हेही वाचा – Dhaakad Box Office Collection: कंगना रनौतचा Dhaakad ठरला बॉलिवूडचा सर्वात फ्लॉप सिनेमा

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -