‘फुकरे 3’च्या रिलीजची केली घोषणा; ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित

एक्सेल एंटरटेनमेंटने बॉलीवूडमधील आपल्या सर्वात बहुप्रतीक्षित आणि यशस्वी कॉमेडी फ्रँचायझी ‘फुकरे 3’च्या रिलीज डेटची घोषणा केली आहे. हा चित्रपट 7 सप्टेंबर 2023 रोजी कृष्ण जन्माष्टमीच्या शुभ मुहूर्तावर प्रदर्शित होण्यासाठी सज्ज आहे. अशातच, प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाबद्दल वाढते क्रेझ लक्षात घेता ‘फुकरे 3’ नवे स्टँडर्ड्स सेट करेल असे म्हणणे योग्य ठरेल.

मृगदीप सिंग लांबाद्वारा दिग्दर्शित तसेच रितेश सिधवानी आणि फरहान अख्तर यांच्या एक्सेल एंटरटेनमेंट अंतर्गत निर्मित ‘फुकरे 3’या सिनेमामध्ये पुलकित सम्राट, वरुण शर्मा, रिचा चढ्ढा, मनजोत सिंग आणि पंकज त्रिपाठी या कलाकारांना पाहायला मिळेल.

 

‘फुकरे’ही एक यशस्वी फ्रँचायझी ठरली असून, या फ्रँचायझीचा दुसरा भाग, ‘फुकरे रिटर्न्स’ने बॉक्स ऑफिसवर वर्चस्व गाजवले होते. तसेच, फ्रँचायझीच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे डिस्कव्हरी किड्स चॅनलवर ‘फुकरे बॉईज’ नावाची अ‍ॅनिमेटेड सिरीज तयार करण्यात आली, ज्याने लहान मुलांसाठी चित्रपटातील अनोख्या पात्रांना टीव्ही स्क्रीनवर पुन्हा जिवंत केले.

फरहान अख्तर आणि रितेश सिधवानी सह-स्थापित एक्सेल एंटरटेनमेंटने ‘झेडएनएमडी’, ‘दिल चाहता है’, ‘डॉन’, ‘डॉन 2’ यांसारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांसह प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. अशातच, सध्या प्रॉडक्शन हाऊस मोस्ट अवेटेड ‘जी ले जरा’साठी तयारी करत आहे.


हेही वाचा :

विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल गुजरातमध्ये ‘पठाण’ला करणार नाही विरोध; कारण…