गुड बाय कौशिकन… व्हिडीओ शेअर करत नीना गुप्तांंची भावनिक पोस्ट

बॉलिवूडमधील प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते सतीश कौशिक यांचे बुधवारी(8 मार्च) निधन झाले आहे. वयाच्या 66 व्या वर्षी त्यांनी अखरेचा श्वास घेतला. याबाबत अभिनेते अनुपम खेर यांनी याबाबत ट्वीट करत माहिती दिली होती. सतिश कौशिक यांच्या निधनामुळे बॉलिवूड चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

सतीश कौशिक गुडगाव येथील एका फार्महाऊसवर गेले होते. तिथून परतत असताना त्यांना गाडीतच हृदयविकाराचा झटका आला. सध्या त्यांचे पार्थिव दिल्लीतील फोर्टिस रुग्णालयात असून लवकरच मुंबईत आणले जाणार आहे. आज त्यांच्यावर मुंबईतच अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी शशी कौशिक आणि मुलगी वंशिका असा परिवार आहे.

अभिनेते अनुपम खेर यांनी याबाबत ट्वीट करत माहिती दिली सतीश कौशिक यांच्या निधनाबाबत माहिती दिली होती. ही दुःखद बातमी कळताच बॉलिवूड चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. अभिनेत्री कंगना रनौत, रितेश देशमुख यांच्यानंतर अभिनेत्री नीना गुप्ता यांनी देखील एक भावुक व्हिडीओ शेअर करत सतीश कौशिक यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.

नीना गुप्ता यांनी शेअर केला व्हिडीओ

 

View this post on Instagram

 

A post shared by Neena Gupta (@neena_gupta)

नीना गुप्ता यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर करत सतीश कौशिक यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. यामध्ये त्या म्हणाल्या की, “मित्रांनो, आज सकाळी मी खूप वाईट बातमीसोबत उठले. या जगात असा एकच माणूस होता जो मला नॅन्सी म्हणून बोलवायचा आणि मी त्याला कौशिकन म्हणायचे. आम्ही बऱ्याच काळापासून एकमेकांना ओळखतो. दिल्लीमधील कॉलेजच्या दिवसांपासून, खूप वाईट झालं. त्यांची लहान मुलगी वंशिका आणि पत्नी शशी… त्यांच्यासाठी खूप कठीण काळ आहे आणि त्यांना काहीही मदत हवी असेल, मी नेहमीच त्यांच्यासोबत असेन आणि मी आहे. देव त्यांना हिंमत देवो. विशेषतः वंशिकाला.”

हा व्हिडीओ शेअर करत नीना गुप्ता यांनी कॅप्शनमध्ये लिहिलंय की, “गुड बाय कौशिकन’, दरम्यान, नीना गुप्ता यांच्या व्हिडीओवर अनेकजण कमेंट्स करुन सतीश कौशिक यांना श्रद्धांजली देत आहेत.


हेही वाचा  :

सतीश कौशिक यांचे पार्थिव दिल्लीहून मुंबईला रवाना; व्हिडीओ व्हायरल