Kangana Ranaut: पंतप्रधनांच्या सुरक्षेतील त्रुटीमुळे कंगनाची आगपाखड, म्हणाली ही तर…

मोदींबाबत घटलेल्या इतक्या मोठ्या घटनेनंतर मोदीभक्त कंगना ( Kangana Ranaut)   शांत कशी बसेल. या संपूर्ण प्रकारवर कंगानाने चांगलीच आगपाखड केली.

Kangana Ranaut share post on pm modi security lapse in punjabi
Kangana Ranaut: पंतप्रधनांच्या सुरक्षेतील त्रुटीमुळे कंगनाची आगपाखड, म्हणाली ही तर...

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Modi)  यांच्या बुधवारी झालेल्या पंजाब दौऱ्यावेळी त्यांच्या सुरक्षेतील त्रुटींमुळे फ्लॉयओव्हरवर असलेल्या आंदोलनकर्त्यांमुळे मोदींची गाडी जवळपास १५-२० मिनिटे थांबली. मोदींच्या सुरक्षितीतेबाबत (pm modi security)  झालेल्या या त्रुटीला केंद्र सरकारने पंजाबच्या सत्तारुढ काँग्रेस सरकारला जबाबदार ठरवले. सोशल मीडियावर देखील काँग्रेसला निशाणा बनवण्यात आले. मोदींबाबत घटलेल्या इतक्या मोठ्या घटनेनंतर मोदीभक्त कंगना ( Kangana Ranaut)   शांत कशी बसेल. या संपूर्ण प्रकारवर कंगानाने चांगलीच आगपाखड केली. पंतप्रधानांच्या सुरक्षेतील त्रुटी या फार लाजिरवाण्या असल्याचे वक्तव्य कंगनाने केले. एवढेच नाही तर पंजाब हे आतंकवाद्यांच्या कारवायांचे केंद्र असल्याचा आरोप देखील केला.

कंगानेन नेहमीप्रमाणे इन्स्टाग्रामवर एक भली मोठी पोस्ट शेअर करत म्हटले आहे की, ‘पंजाबमध्ये जे झाले ते फार लाजिरवाणे होते. आदरणीय पंतप्रधान हे लोकशाही पद्धतीने भारतात निवडून आले आहेत. लोकांचे नेते, प्रतिनिधी आणि १४० कोटी जनतेचा ते आवाज आहेत. त्यांच्यावर अशाप्रकारे झालेला हल्ला म्हणजे देशातील प्रत्येक नागरिकावर झालेला हल्ला आहे. हा आपल्या लोकशाहीवर झालेला हल्ला आहे’,असे कंगनाने म्हटले आहे.

कंगानाने पुढे पंजाब सरकारवर चांगलाच हल्लाबोल केलाय. कंगनाने म्हटलेय, ‘पंजाब हे आतंकवाद्यांच्या कारवायांचे केंद्र बनले आहे. त्यांना आताच थांबवले नाही तर देशाचे मोठे नुकसान होईल’. यासोबत कंगनाने Bharat Stand With Modi Ji… हॅशटॅग वापरला आहे. कंगनाच्या या पोस्टचे सोशल मीडियावर अनेकांनी कौतुक केले आहे.

पंजाबमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गाड्यांचा ताफा फिरोजपुर येथील उड्डाणपुलावरुन जाणार होता. या मार्गावर शेतकरी आंदोलन करत होते. मोदींच्या ताफ्यासाठी हा मार्ग पोलिसांकडून रिकामा करण्यात आला नाही. पंतप्रधान मोदी यांच्या ताफ्यात मुख्य सचिव आणि डीजीपींसाठी गाडी राखीव ठेवण्यात आली होती. परंतु मुख्य सचिव आणि डीजीपीसारखे मोठे अधिकारी सहभागी नव्हते. कोणत्याही राज्यात पंतप्रधान मोदी दौऱ्यासाठी येणार असतील तर त्यांच्या स्वागतासाठी राज्याचे मुख्यमंत्री आणि मुख्य सचिव उपस्थित राहतात. परंतु पंजाबमध्ये असे काही घडले नाही. त्यामुळे मोदींच्या सुरक्षिततेबाबत पंजाब सरकार किती अलर्ट आहे असा प्रश्न निर्माण झाला.


हेही वाचा – PM मोदींच्या सुरक्षेतील चुकीचं प्रकरण थेट सुप्रीम कोर्टात, CM चन्नींकडूनही चौकशी समिती गठीत